इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल, प्रोटोकॉल तोडत मोदींनी केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 02:55 PM2018-01-14T14:55:04+5:302018-01-14T14:55:56+5:30
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं आहे.
नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं आहे. नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौ-यावर आली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी 14 वर्षांनंतर भारत दौरा केला आहे. नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून तीन मूर्ती हायफा चौक ठेवण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलन केलं. यापूर्वी 2003मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौ-यावर आले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्रायलला गेले होते. त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी भारतीय शेफनं त्यांच्यासाठी खास डिनर तयार केलं होतं. विशेष म्हणजे हा शेफ नेतान्याहू यांच्याही आवडीचा आहे.
#WATCH Israel PM Netanyahu & PM Modi pay tribute at Teen Murti Haifa Chowk in Delhi #NetanyahuInIndiapic.twitter.com/etCxFefNCO
— ANI (@ANI) January 14, 2018
रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतान्याहू एकत्र डिनर करणार आहेत. नेतान्याहू सर्वात आधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांचीही भेट घेणार आहेत. नेतान्याहू पत्नी साराला आग्रालाही घेऊन जाणार आहेत. तिथे ते ताजमहाल पाहणार आहेत. आग्राच्या दौ-यात नेतान्याहूंसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. या दौ-यात नेतान्याहू गुजरात आणि मुंबईला भेट देणार आहे.