Happy Friendship Day: इस्रायलनं 'हे' खास बॉलीवुड सॉंग ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 08:44 PM2020-08-02T20:44:10+5:302020-08-02T20:50:40+5:30
या गाण्यात दूतावासाने अनेक फोटो दाखवले आहेत. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सोबत असलेलाही फोटो आहे.
नवी दिल्ली/जेरूसलेम -इस्रायली दुतावासाने (Israel Embassy) ट्विटरवर फ्रेंडशिप डे (Friends Day) साजरा करत भारत-इस्रायलची मैत्री (Friendship of India-Israel) आणि भागीदारी अधिक घट्ट करण्यासंदर्भात भाष्य केले आहे. या ट्विटमध्ये शुभेच्छा देताना इस्रायली दुतावासाने लिहिले आहे, 'हॅप्पी फ्रेंडशिप डे 2020 इंडिया.'
बॉलीवुडच्या गाण्यासह फोटोही केले ट्विट -
या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे, भविष्यात आपली मैत्री आणि वाढती भागीदारी आणखी घट्ट होईल. इस्रायली दूतावासाने या शुभेच्छा बॉलीवुडचे एका प्रसिद्ध गाणे ट्विट करत दिल्या आहेत. हे गाणे महानायक अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांच्या याराना या चित्रपटातील आहे. हे गाणे मैत्रीचा एखादा प्रसंग आला की अनेक जण गुणगुणताना दिसतात. हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. हे गाणे आहे, "तेरे जैसा यार कहाँ, कहां ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना..."
या गाण्यात दूतावासाने अनेक फोटो दाखवले आहेत. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सोबत असलेलाही फोटो आहे.
🎶🎵 तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना 🇮🇱❤️🇮🇳#HappyFriendshipDay2020 India!
— Israel in India (@IsraelinIndia) August 2, 2020
May our #Friendship & #GrowingPartnership strengthen even more in future!
Share a picture telling us what makes 🇮🇱🇮🇳 friendship so special! #FriendsForeverpic.twitter.com/Fd9YzjZuzQ
भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक कोरोना तपासणीच्या नव्या पद्धतीवर करतायत संशोधन
भारत आणि इस्रायलचे वैत्रानिक सध्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसंदर्भात 4 नव्या पद्धतींवर काम करत आहेत. यातील दोन चाचण्या लाळेची तपासणी केल्यानतंर काही मिनिटांतच निकाल देतील. तिसऱ्या चाचणीत एखाद्याच्या आवाजावरूनच सांगितले जाऊ शकते, की संबंधित व्यक्ती कोरोग्रस्त आहे अथवा नाही. तर चौथ्या चाचणीत श्वासाच्या रेडिओ वेवने संक्रमणाची तपासणी करता येऊ शकेल. या संशोधनात या वैज्ञानिकांना यश आले, तर हा कोरोनाबरोबरच्या युद्धात टर्निंग पॉईंट सिद्ध होऊ शकतो. कारण या चाचण्यांच्या माध्यमाने केवळ 30 मिनिटांतच कोरोना चाचणीचा अहवाल येऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या -
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला
तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...
शुक्रिया मोदी भैया : मुस्लीम महिलांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला बांधली राखी, 'या'साठी मानले आभार
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन
युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...