इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत दौरा; राष्ट्रपती भवनात दिलं 'गार्ड ऑफ ऑनर', नेतन्याहू म्हणाले मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 11:27 AM2018-01-15T11:27:29+5:302018-01-15T11:29:19+5:30

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

Israeli prime minister benjamin netanyahu receives guard of honour at rashtrapati bhavan | इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत दौरा; राष्ट्रपती भवनात दिलं 'गार्ड ऑफ ऑनर', नेतन्याहू म्हणाले मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात

इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत दौरा; राष्ट्रपती भवनात दिलं 'गार्ड ऑफ ऑनर', नेतन्याहू म्हणाले मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात

googlenewsNext

नवी दिल्ली-  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. रविवारी नेतन्याहू नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी राष्ट्रपती भवनात त्या गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर हे सगळं सुरू झालं. त्यानंतर मी भारताचा दौरा केला. माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी इस्रायलच्या नागरिकांसाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही देशांमध्ये समृद्धी, शांती आणि  प्रगतीसाठी मिळून काम करूया, असं यावेळी नेतन्याहू यांनी म्हंटलं. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर नेतन्याहू व त्यांच्या पत्नीने राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 





 

भारत व इस्रायल या दोन्ही देशांच्या मैत्रीची जोडी स्वर्गात बनली आहे. असं असताना संयुक्त राष्ट्रात दिलेलं एक मत नातं नाही बदलू शकत. जेरूसलेमच्या मुद्द्यावर भारताने युएनमध्ये इस्रायल विरोधात मत दिलं होतं. यामुळे निराशा झाली पण ते एक मत दोन्ही देशामधील नात्यात दूरावा आणू शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले. 



 

राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींनी विमानतळावर केलं नेतन्याहूंचे स्वागत
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौ-यासाठी भारतात दाखल झाले असून, राजशिष्टाचाराचे संकेत सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी विमानतळावर त्यांची गळाभेट घेऊन जोरदार स्वागत केलं. इस्रायलचे पंतप्रधान १५ वर्षांनी भारतात आले आहेत. नेतन्याहू यांच्यासोबत पत्नी सारा आल्या आहेत. मोदी यांनी इंग्रजी आणि हिब्रू भाषेत ट्विट  केले की, माझे मित्र नेतन्याहू भारतात स्वागत आहे. भारतातील दौरा ऐतिहासिक आणि विशेष आहे. यातून दोन्ही देशातील मैत्री आणखी मजबूत होईल.

यंदाचे वर्ष हे भारत व इस्रायल यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याचे २५ वे वर्षे आहे. नेतन्याहू यांच्यासोबत आजवर कधीही नव्हते एवढे मोठे व्यापारी शिष्टमंडळही आले आहे. या भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, आर्थिक सहकार्य, संरक्षण, दहशतवाद नियंत्रण, अशा विविध क्षेत्रांत अनेक करार अपेक्षित आहेत.

Web Title: Israeli prime minister benjamin netanyahu receives guard of honour at rashtrapati bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.