विक्रम आणि प्रज्ञान जागे झाले नाही, तरी टेन्शन नाही...! ISRO ला अजूनही मोठी आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:56 PM2023-10-02T21:56:10+5:302023-10-02T21:58:20+5:30
Chandrayaan-3 : भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे.
चंद्राच्या दक्षिण धृवावर झेंडा रोवून भारताने इतिहास रचला. भारताच्या चंद्रयान-3 ने अपेक्षेप्रमाणे काम केले आहे. एवढेच नाही, तर त्याने त्याच्या क्षमतेपेक्षाही अधिक काम करून दाखवले. भारताची चंद्रयान मोहीम आता संपुष्टात येणार आहे. कारण आणखी तीन-चार दिवसांनी चंद्रावरील शिव-शक्ती पॉइंटवर रात्र होणार आहे. याच बरोबर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा एकदा जागे होण्याची आशाही मावळणार आहे. मात्र, असे असले तरी, चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉडेलकडून आशा कायम आहे.
महत्वाचे म्हणजे, चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल गेल्या 58 दिवसांपासून सातत्याने चंद्राभोवती फिरत आहे. प्रोपल्शन मॉड्यूलने आतापर्यंत बराचसा डेटाही पाठवला आहे. या प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये एक उपकरण सेट केले आहे. SHAPE असे या उपकरणाचे नाव आहे. याचा अर्थ आहे, स्पेक्ट्रो-पोलॅरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ. हे आकाशातील छोटे ग्रह शोधत आहे. याशिवाय एक्सोप्लॅनेट्सलाही शोधत आहे. एक्सोप्लॅनेट्सचा अर्थ सौर मंडळाबाहेरील ग्रहांचा शोध घेत आहे.
SHAPE चा उद्देश ग्रहांवरील जीवनासंदर्भात संकेत देणे अथवा मानवाला राहता येईल अशा ग्रहांचा शोधणे हा आहे. पोलोद सातत्याने या कामात व्यस्त आहे. डेटा पाठवत आहे. हे ग्रहांच्या शोधासाठी नियर-इंफ्रारेड (NIR) वेव्हलेन्थचा वापर करते. अर्थात, प्रोप्लशन मॉडेल चांद्रा भोवती फिरताना सुर्यमालेबाहेर असलेल्या ग्रहांचा शोध घेत आहे.