Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या 'या' उत्तराने जिंकली सर्वांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 02:39 PM2019-09-11T14:39:49+5:302019-09-11T14:49:52+5:30
इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत.
नवी दिल्ली - 'चांद्रयान 2' मोहिमेतील शेवटचा टप्पा पार पडताना विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला. अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरापासून दूर असतानाच हा तुटला. मात्र, विक्रम लँडरशी संपर्क होण्याची शास्त्रज्ञांना आशा कायम आहे. 'नासा' कडूनही 'इस्रो' चं कौतुक झालं आहे. त्यानंतर आता इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या एका उत्तराने सर्वांची मनं जिंकली आहेत.
एका वृत्तवाहिनीने के. सिवन यांची मुलाखत घेतली. माध्यम प्रतिनिधीने सिवन यांना 'एका तमिळ व्यक्तीला येवढा मोठा सन्मान मिळाला, तेव्हा तुम्ही तमिळनाडूच्या जनतेला काय संदेश द्याल,' असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी 'सर्वात आधी मी एक भारतीय आहे' असे उत्तर दिले. या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
SunTV: As a Tamil, having attained a big position, what do u want to say to ppl of TN?
— Ethirajan Srinivasan (@Ethirajans) September 10, 2019
Sivan: First of all, I am an Indian, I joined #ISRO as an Indian & ISRO is a place where people from all regions & languages work, contribute, but I am grateful to my brothers who celebrate me pic.twitter.com/tES7uzNCJO
के. सिवन यांनी 'सर्वात आधी मी एक भारतीय आहे. एक भारतीय म्हणून इस्रोमध्ये आलो. इस्रो एक असं ठिकाण आहे जिथे सर्व भाषेचे आणि प्रांताचे लोक एकत्र काम करून आपलं योगदान देतात' असं उत्तर दिलं आहे. सिवन यांच्या उत्तरानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चांद्रयान -2 संदर्भात सोमवारी (9 सप्टेंबर) एक आनंदाची बातमी मिळाली. विक्रम लँडर नियोजित जागेच्या जवळ आहे. त्याचं नुकसान झालेलं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर ते थोडं तिरकं आहे अशी माहिती चांद्रयान मिशनशी संबंधित असणाऱ्या इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
ISRO chief K Sivan's "I am an Indian first" reply to a Tamil channel is stealing all hearts. But I have a question.
— viswanath viswanath (@viswanath_vis) September 10, 2019
When a PV Sindhu makes India proud, the people of her State highlight her regional identity.
How do we reconcile this dichotomy?#SivanPrideOfIndia
इस्रोच्या कामगिरीचं अनेक देश कौतुक करत आहेत. चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीने सुरू ठेवा असं म्हटलं आहे. चीनच्या सोशल मीडियावर भारताच्या चांद्रयान- 2 मोहिमेचं भरभरून कौतुक होत आहे. चीनची सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सने एका युजरला कोट करत भारतीय शास्त्रज्ञांनी उत्तम प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच कोणताही देश जर अंतराळातील संशोधनात प्रगती करत असेल तर त्याचा आम्ही सन्मान करतो. चांद्रयानाच्या अॅटिट्यूड कंट्रोल थ्रस्टरवरील (ACT) नियंत्रण न झाल्यानेच संपर्क तुटला असावा अशी शक्यता चीनमधील एका शास्त्रज्ञाने व्यक्त केल्याचं देखील ग्लोबल टाईम्सने म्हटलं आहे.
Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री https://t.co/u8ETyrwdOW#Chandrayaan2
— Lokmat (@MiLOKMAT) September 10, 2019
इस्रोच्या अधिकाऱ्याने सोमवारी (9 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, 'विक्रमने हार्ड लँडिंग केलं आहे आणि ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार विक्रम नियोजित स्थळाजवळ आहे. विक्रम तुटलेलं नाही आणि ते सुरक्षित आहे.' इस्रोच्या आणखी एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर विक्रम लँडरचा एक जरी भाग निकामी झाला असेल तरी संपर्क साधणं कठीण होईल. पण आतापर्यंतची स्थिती चांगली आहे. चंद्रापासून 2.1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर लँडर विक्रमशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित केला जाऊ शकतो. विक्रमचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरलं असलं, तरीही ते स्वत:च्या पायावर उभं राहू शकतं. इस्रोला विक्रमशी संपर्क साधण्यात यश आल्यास भारताच्या नावावर ऐतिहासिक कामगिरीची नोंद होईल.