ISRO प्रमुख एस सोमनाथ यांना कर्करोग, Aditya-L1 च्या लाँचिंगवेळीच गंभीर आजारपण आलं समोर, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 03:23 PM2024-03-04T15:23:06+5:302024-03-04T15:24:18+5:30
ISRO chief S Somnath: भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ कर्करोगाशी झुंजत होते, अशी धक्कादायक माहिची समोर आली आहे.
भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणावेळी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) प्रमुख एस. सोमनाथ कर्करोगाशी झुंजत होते, अशी धक्कादायक माहिची समोर आली आहे.
एका मुलाखतीमध्ये स्वत: एस. सोमनाथ यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. चंद्रयान-३ मोहिमेच्या लाँचिंगदरम्यान त्यांना काही आरोग्यविषयक समस्या जाणवल्या होत्या. मात्र त्यावेळी काही स्पष्टपणे समजत नव्हते. मला आदित्य एल-१ मोहिमेच्या प्रक्षेपणादिवशीच या आजाराबाबत समजलं. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय चिंतेत पडलो होतो, असे सोमनाथ यांनी सांगितले.
सोमनाथ यांच्या आजारपणाबाबत कळल्यावर सहकारी शास्त्रज्ञांनाही धक्का बसला होता. मात्र त्यांनी या आव्हानात्मक वातावरणात स्वत:ला सावरले. कुटुंब आणि सहकारी शास्त्रज्ञांनाही आधार दिला. तसेच आदित्य एल-१ च्या प्रक्षेपणानंतर त्यांच्या पोटाचं स्कॉन करण्यात आलं. त्यानंतर या गंभीर आजाराचा उलगडा झाला. मात्र नंतर अधिक तपासासाठी ते चेन्नईमध्ये गेले. त्यामधून सोमनाथ यांना हा आजार अनुवांशिकरीत्या मिळाल्याचे समोर आले.
काही दिवसांमध्ये सोमनाथ यांना कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानंतर सोमनाथ यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सोमनाथ यांना केमोथेरेपी दिली जात आहे. ही गोष्ट समजली तेव्हा संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. मात्र आता असं काही नाही आहे. उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली आहे. सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. या काळात सोमनाथ यांना त्यांचं कुटुंब आणि मित्रांनी खूप सहकार्य केलं.