ISRO Launch of SSLV-D3 : इस्रोनं इतिहास रचला, EOS-8 सॅटेलाइट लॉन्च, होणार मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:56 AM2024-08-16T11:56:55+5:302024-08-16T11:58:04+5:30

इस्रोचे SSLV-D3 रॉकेट लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे, कारण...

ISRO created history launches sslv d3 rocket with eos8 satellite sr 0 demosat satellite will help in disaster and water management | ISRO Launch of SSLV-D3 : इस्रोनं इतिहास रचला, EOS-8 सॅटेलाइट लॉन्च, होणार मोठा फायदा!

ISRO Launch of SSLV-D3 : इस्रोनं इतिहास रचला, EOS-8 सॅटेलाइट लॉन्च, होणार मोठा फायदा!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:17 वाजता पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून SSLV-D3 रॉकेट लॉन्च केले. या मिशनअंतर्गत देशाचे नवे अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट EOS-8 आणि एक छोटे सॅटेलाइट SR-0 DEMOSAT लॉन्च केले. हे दोन्ही सॅटेलाइट्स पृथ्वीपासून सुमारे 475 किलोमीटर एवढ्या उचीवर असलेल्या गोलाकार कक्षेत स्थापित केले जातील. इस्रोचे हे लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे.

इस्रोचे SSLV-D3 रॉकेट लॉन्चिंग ऐतिहासिक मानले जात आहे, कारण हे दोन महत्वाचे सॅटेलाइट्स, EOS-8 आणि SR-0 DEMOSAT ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी एक महत्वाचे मिशन आहे. हे SSLV चे तिसरे लॉन्चिंग आहे आणि भारताच्या छोट्या सॅटेलाइट लॉन्च उद्योगासाटी एका मैलाचा दगड सिद्ध होऊ शकते. या शिवाय, EOS-8 आणि SR-0 DEMOSAT च्या यशस्वी लॉन्चिंग आणि ऑपरेशनमुळे अंतराळ तंत्रज्ञानात भारताची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल. हे जागतिक अंतराळ स्पर्धेत एक महत्वाचे योगदान असेल.

शेती, वन्यजीव आणि आपत्तीमध्ये मदत मिळेल -
SSLV-D3 रॉकेट पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 500 किलोग्रॅमपर्यंतच्या सॅटेलाइट्सना 500 किलोमीटर अथवा 300 किलोग्रॅमच्या सॅटेलाइट्सना सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये पाठवू शकते. या ऑर्बिटची उंची 500 किलोमीटरच्या वर असते. या लॉन्चिंगमध्ये हे 475 किलोमीटरच्या ऊंचीपर्यंत जाईल. तेथे गेल्यानंतर ते सॅटेलाइटला सोडेल.
 
EOS-8 सॅटेलाइट: 
हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे, याचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे आणि महत्त्वपूर्ण डेटा गोळा करणे, असा आहे. याच्या सहाय्याने कृषी, वन्यजीव निरीक्षण, जलस्रोत व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्येही मदत होईल.

SR-0 DEMOSAT :  
हे एक छोटे सॅटेलाइट आहे. जे पॅसेन्जर सॅटेलाइट म्हणून पाठवले जात आहे. नवीन तांत्रिक चाचण्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा याचा उद्देश आहे.

Web Title: ISRO created history launches sslv d3 rocket with eos8 satellite sr 0 demosat satellite will help in disaster and water management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.