ISRO EOS-03 launch News : इस्रोचे EOS-03 सॅटेलाइट लॉन्चिंग मिशन फेल, क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 06:22 AM2021-08-12T06:22:46+5:302021-08-12T06:23:51+5:30

इस्रोने यशस्वीपणे लॉन्चिंग केल्यानंतर उपग्राहाच्या सर्व स्टेज ठरलेल्या वेळी वेगळ्या होत गेल्या. संपूर्ण प्रवास 18.39 मिनिटांचा होता. मात्र, शेवटी EOS-3 वेगळे होण्याआधीच क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही बिघाड झाला.

isro launch of gslv f10 eos-03 eyes in space satish dhawan space centre sriharikota | ISRO EOS-03 launch News : इस्रोचे EOS-03 सॅटेलाइट लॉन्चिंग मिशन फेल, क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड

ISRO EOS-03 launch News : इस्रोचे EOS-03 सॅटेलाइट लॉन्चिंग मिशन फेल, क्रायोजेनिक इंजिनमध्ये बिघाड

googlenewsNext

श्रीहरीकोटा -भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)(ISRO) 12 ऑगस्टला सकाळी 5.43 वाजता अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट (EOS-3)चे GSLV-F10 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वी लॉन्चिंग केले. मात्र, मिशनमध्ये वेळेच्या 10 सेकेंद आधीच गडबड झाली. मिशन कंट्रोल सेंटरला रॉकेटच्या तिसऱ्या स्टेजमध्ये असलेल्या क्रायोजेनिक इंजिनकडून 18.29 मिनिटाला सिग्नल आणि आकडे मिळणे बंद झाले होते. यामुळे मिशन कंट्रोल सेंटरमधील वैज्ञानिक अस्वस्थ झाल्याचेही दिसून आले. वैज्ञानिक काही वेळ आकडे मिळण्याची आणि अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत होते. यानंतर मिशनचे डायरेक्टर यांनी इस्रो प्रमुख डॉ. के. सिवन यांना ही माहिती दिली आणि इस्रो प्रमुखांनी, क्रायोजेनिक इंजिनमध्ये काही तांत्रिक दोष आढळला आहे. यामुळे हे मिशन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही, असे सांगितले. (isro launch of gslv f10 eos-03 eyes in space satish dhawan space centre sriharikota)

EOS-3 मिशन अंशतः अयशस्वी ठरल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर लगेचच लाइव्ह प्रसारणही बंद करण्यात आले. हे मिशन यशस्वी झले असते, तर सकाळी साधारणपणे साडदहा वाजल्यापासूनच या सॅटेलाइटने भारताचे फोटो घ्यायला सुरुवात केली असती. या लॉन्चिंगसोबतच इस्रोने पहिल्यांदाच तीन कामे केली. पहिले काम, सकाळीच साधारणपणे पावने सहावाजता सॅटेलाइट लॉन्च केले. दुसरे काम, जिओ ऑर्बिटमध्ये अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट स्थापित करणे आणि तिसरे काम ओजाइव पेलोड फेयरिंग म्हणजे, उपग्रह अंतराळात पाठविणे. 

EOS-3 (Earth Observation Satellite-3) जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हिकल-एफ 10 (Geosynchronous Satellite Launch Vehicle-F10)च्या सहाय्याने लॉन्च करण्यात आले. हे रॉकेट 52 मिटर ऊंच आणि 414.75 टन वजनाचे होते. याच्या तीन स्टेज होत्या. हे 2500 किलो पर्यंतच्या सॅटेलाइटला जिओट्रान्सफर ऑर्बिटपर्यंत पोहोचवू शकते. EOS-3 सॅटेलाइटचे वजन 2268 किलो एवढे आहे. EOS-3 सॅटेलाइट हे भारताचे अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट आहे. हे सॅटेलाइट जिओट्रान्सफर ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर स्वतःच आपल्या निर्धारित कक्षेत स्थापित झाले असते. मात्र, ते पोहोचू शुकले नाही. या सॅटेलाइटला "आय इन द स्काय" (आकाशातील डोळा) असेही म्हटले जात होते.

...म्हणून निवडली सकाळची वेळ -
इस्रोने पहिल्यांदाच सकाळच्या सुमारास आपले एखादे सॅटेलाइट लॉन्च केले आहे. यापूर्वी या वेळेवर कधीही कुठलेही अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट सोडण्यात आलेले नव्हते. यामागे वैज्ञानिक कारणही होते. यात सकाळच्या स्वच्छ हवामानाचा फायदा मिळाला असता आणि दुसरे म्हणजे, सूर्य प्रकाशात अंतराळात फिरणाऱ्या आपल्या उपग्रहावर लक्ष ठेवणे सोपे झाले असते.

Web Title: isro launch of gslv f10 eos-03 eyes in space satish dhawan space centre sriharikota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.