'जीसॅट 7 ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, हवाई दलाचे सामर्थ्य वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:31 PM2018-12-19T16:31:24+5:302018-12-19T16:32:26+5:30
भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट ' GSAT-7A' चे बुधवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
श्रीहरीकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट 'जीसॅट 7 ए'चे बुधवारी श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले.
'जीसॅट 7 ए' सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. 'जीसॅट 7 ए' हे सॅटलाइट हवाई दलासाठी फायदेशीर आहे. GSAT-7A या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीने वाढ होणार आहे.
2250 किलोच्या 'जीसॅट 7 ए' च्या रूपाने हवाई दलाच्या ताफ्यात अखंड संपर्क देणारा उपग्रह दाखल होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय कारवायांमध्ये लढाऊ विमाने आणि ग्राउंड स्टेशन सतत संपर्कात राहू शकतील. याशिवाय, 'जीसॅट 7 ए' हे फक्त हवाई दलाच्या एअरबेसशीची इंटरलिंक होणार नाही, तर ड्रोन ऑपरेशनमध्येही या उपग्रहाची मदत होणार आहे.
#WATCH: Communication satellite GSAT-7A on-board GSLV-F11 launched at Satish Dhawan Space Centre in Sriharikota. pic.twitter.com/suR92wNBAL
— ANI (@ANI) December 19, 2018
'जीसॅट 7 ए' या उपग्रहाच्या माध्यमातून ड्रोनवर आधारित असलेल्या मोहिमांमध्ये हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे. त्यात भारत अमेरिकेकडून प्रिडेटर-बी, सी गार्डियन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या ड्रोनला उपग्रहाच्या माध्यमातून नियंत्रित करून शत्रूंवर हल्ला करता येणार आहे. या उपग्रहाचा खर्च जवळपास 500 ते 800 कोटींच्या घरात आहे.
'जीसॅट 7 ए' या उपग्रहामध्ये 4 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. जे जवळपास 3.3 किलोवॉट वीजनिर्मितीत करणार आहेत. तसेच या उपग्रहात अवकाशातील कक्षांमध्ये वर-खाली स्थिरावण्यासाठी केमिकल प्रोपल्शन सिस्टीमही देण्यात आले आहे. तत्पूर्वी इस्रोनेGsat-7 या रुक्मिणी नावाचे सॅटलाइटही लाँच केले होते. या सॅटलाइटचे लाँचिंग 29 सप्टेंबर 2013मध्ये करण्यात आले होते. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्याचा या उपग्रहाचा उद्देश होता. या उपग्रहाच्या माध्यमातून युद्धनौका, पाणबुड्या आणि वायुसेनेच्या संचाराची सुविधा पुरवण्यात आली होती.
Update #11#GSLVF11 lifts-off carrying #GSAT7A onboard from Sriharikota.
— ISRO (@isro) December 19, 2018
Updates to follow.#ISROMissionspic.twitter.com/cZobUTtEO4