बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:07 AM2023-08-31T11:07:49+5:302023-08-31T11:10:50+5:30
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानीकावर कथित हल्ल्याच्या प्रकार समोर आले आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथून ही घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल गोच आहे. आशीष लांबा असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसही अलर्ट मोडवर आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, 23 ऑगस्ट रोजीच इस्रोने पाठवलेल्या चांद्रयान 3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर, संपूर्ण देशाने इस्रोचे अभिनंदन केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमाने दिली आहे. महत्वाचे म्हणजे, घटनास्थळापासून इस्रोचे कार्यालनय थोड्याच अंतरावर आहे.
आशीष लांबा म्हटले आहे, "काल, इस्रो कार्यालयाजवळ नव्याने बांधलेल्या HAL अंडरपासजवळ, एक हेल्मेट न घातलेली व्यक्ती बे जबाबदारपणे स्कूटी चालवत आमच्या समोर आली आणि आम्हाला अचानक ब्रेक लावावा लागला," आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, 'तो आमच्या कार जवळ आला आणि भांडू लागला. त्याने दोन वेळा माझ्या कारला पाय मारला.'
@blrcitytraffic@CPBlr@BlrCityPolice Yesterday during going to ISRO office,Near to newly constructed HAL underpass, a person on scooty (KA03KM8826) without helmet was driving recklessly and coming in front of our car suddenly and so We had to apply sudden brake. pic.twitter.com/xwDyEy2peA
— Aashish Lamba (@lambashish) August 30, 2023
घटनेची माहिती मिळताच बेंगळुरू पोलीसही सतर्क झाले आहेत. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी म्हटले आहे की, "घटनेची नोंद करण्यात आली असून आम्ही संबंधित अधिकार्यांना याची माहिती देऊ." तसेच, त्यांनी पुढील चौकशीसाठी लांबा यांचा संपर्क तपशील मागवला आहे. तसेच दुसरीकडे सोशल मीडिया युजर्सनीही हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली आहे.