इस्त्रोच्या मोठ्या वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा; विष देऊन झाला होता जीवे मारण्याचा प्रयत्न   

By प्रविण मरगळे | Published: January 6, 2021 09:40 AM2021-01-06T09:40:32+5:302021-01-06T09:42:43+5:30

या विषप्रयोगानंतर मला सलग २ वर्ष उपचार घ्यावे लागले त्यामुळे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही.

ISRO scientist Tapan Mishra claims; There was an attempt to kill him by giving poison | इस्त्रोच्या मोठ्या वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा; विष देऊन झाला होता जीवे मारण्याचा प्रयत्न   

इस्त्रोच्या मोठ्या वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा; विष देऊन झाला होता जीवे मारण्याचा प्रयत्न   

googlenewsNext
ठळक मुद्देतपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये एम्समधील मेडिकल रिपोर्टचे फोटोही जोडले आहेत.बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून विष देण्यात आलं होतं२३ मे २०१७ मला जीवघेणा आर्सेनिक ट्रायऑक्साइड(Arsenic Trioxide) देण्यात आलं होतं

अहमदाबाद - इस्त्रोचे मोठे वैज्ञानिक आणि अहमदाबाद स्पेस एप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक तपन मिश्रा यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. २०१७ मध्ये तपन मिश्रा यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला, याबाबत मिश्रा यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे, जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला याबाबत स्पष्टता केली नाही.

तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, मला विष कोणी आणि का दिलं याबाबत मला कल्पना नाही, बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून विष देण्यात आलं होतं, घरी जे आर्सेनिक दिलं जातं, ते ऑर्गेनिक होतं, जे विष मला दिलं होतं ते इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होतं, याची एक ग्राम प्रमाणही कोणत्या मनुष्याला जीवे मारण्यासाठी पुरेसे असतं. 

तसेच या विषप्रयोगानंतर मला सलग २ वर्ष उपचार घ्यावे लागले त्यामुळे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मी भाग्यवान आहे कारण हे विष प्यायल्यानंतर कोणीही जिवंत वाचू शकत नाही, मी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यामुळे मी मेलो तरी माझ्यासोबत काय घडलं हे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी ही पोस्ट करत आहे. तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये एम्समधील मेडिकल रिपोर्टचे फोटोही जोडले आहेत. 

त्याचसोबत तपन मिश्रा यांनी असंही लिहिलं आहे की, इस्त्रोमध्ये मोठ्या वैज्ञानिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळतात, १९७१ मध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर १९९९ मध्ये VSSC चे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले गेले, इतकचं नाही तर १९९४ मध्ये श्री नांबीनारायणचं प्रकरणही सगळ्यांसमोर आलं होतं, पण मला माहिती नव्हतं की, मी एक दिवस या रहस्याचा भाग बनेन असं ते म्हणाले. 

दरम्यान, २३ मे २०१७ मला जीवघेणा आर्सेनिक ट्रायऑक्साइड(Arsenic Trioxide) देण्यात आलं होतं, यानंतर मागील २ वर्षापासून माझी अवस्था बिकट झाली होती, मुलाखतीनंतर कठीण प्रसंगातून मी बंगळुरूहून अहमदाबादला परतलो होतो. याठिकाणी आल्यानंतर मला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक रूग्णालयात दाखल केले, श्वास घेण्यास त्रास झाला, शरीराची त्वचा निघत होती, हातापायाच्या बोटांमधून नखे निघू लागली, न्युरोलॉजिकल समस्या उद्भवल्या, सौम्य ह्दयविकाराचा झटका आला, फंगल इंफेक्शन सुरू झालं होतं असं तपन मिश्रांनी सांगितले. मिश्रा यांच्यावर अहमदाबादच्या जायडस कॅडिला, मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, दिल्लीच्या एम्समध्ये उपचार करण्यात आले, या उपचारासाठी जवळपास २ वर्ष लागली, तपन मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पुरावा म्हणून तपास रिपोर्ट, एम्सची कागदपत्रे, हातापायाचे फोटो अपलोड केले आहेत. 
 

Web Title: ISRO scientist Tapan Mishra claims; There was an attempt to kill him by giving poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.