‘इस्रो’ने सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

By admin | Published: May 29, 2017 04:01 AM2017-05-29T04:01:58+5:302017-05-29T04:01:58+5:30

यशस्वी झाल्यास ज्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल असा भारतीय अंतराळ

ISRO started preparations for the first human interval | ‘इस्रो’ने सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

‘इस्रो’ने सुरू केली पहिल्या मानवी अंतराळवारीची तयारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीहरीकोटा: यशस्वी झाल्यास ज्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल असा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला आजवरचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणासाठी सज्ज होत आहे.
पूर्ण वाढ झालेल्या २०० आशियाई हत्तींएवढे किंवा प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या जंबो जेट विमानाहून पाचपट म्हणजे ६४० टन एवढे वजन असलेले ‘जिओरिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिएकल मार्क-३’ (जीएसएलव्ही-एमके-३) अशा नावाचा हा अग्निबाण सतीश धवन अंतराळ तळाच्या लॉन्चपॅडवर आणून उभा करण्यात आला असून मान्सूनपूर्वीच्या असह्य उन्हाळ््यातही ‘इस्रो’चे अभियंते तो पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज करीत आहेत.
‘इस्रो’चे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी सांगितले की, या अग्निबाणाचे लवकरच पहिले चाचणी उड्डाण करण्यात येणार आहे. अशी किमान सहा चाचणी उड्डाणे यशस्वी झाली तर पुढील दशकभरात हाच अग्निबाण वापरून भारतीय अग्निबाण वापरून भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात धाडणेही शक्य होऊ शकेल.
सरकारने ३-४ अब्ज डॉलर एवढ्या खर्चाला मंजुरी दिली की लगेच २/३ अंतराळवीरांना घेऊन याने अंतराळात सोडण्याची योजना ‘इस्रो’ने तयार केली आहे. यात यश आले तर मानवाला अंतराळात धाडण्याची वैज्ञानिक क्षमता असलेला भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर जगातील चौथा देश ठरेल. विशेष म्हणजे भारतातून अंतराळात पाठविली जाणारी पहिली अंतराळयात्री महिला असावी, अशी ‘इस्रो’ची इच्छा आहे.
मानवी अंतराळवारीखेरीज अधिक मोठे उपग्रह अंतराळात सोडण्याच्या दृष्टीनेही या प्रकारचा अग्निबाण भारताच्या दृष्टीने मोलाचा ठरेल. अशा अग्निबाणांच्या साह्याने चार टन वजनाचे उपग्रहही भूस्थिर कक्षेत नेऊन सोडणे शक्य होईल. अशा अग्निबाणास प्रत्येकी ३०० कोटी रुपये खर्च येणार असला तरी तो पुरेपुर वसूल होईल. कारण सध्या भारताला चार टन वर्गातील मोठे दळणवळण उपग्रह फ्रान्सच्या एरियान-५ अग्निबाणाने दक्षिण अमेरिकेतील कोऊरो येथून सोडावे लागतात. नवा अग्निबाण यशस्वी ठरला तर त्याने असे उपग्रह भारतातूनच कमी खर्चात सोडता येतील. शिवाय इतर देशांचे असे मोठे उपग्रह व्यापारी तत्वावर प्रक्षेपित करून अब्जावधी डॉलरच्या बाजारपेठेतही भारत आपला हिस्सा मिळवू
शकेल. (वृत्तसंस्था)

अशी आहेत नव्या अग्निबाणाची बलस्थाने

भारताने आत्तापर्यंत विकसित केलेल्या मोठ्या अग्निबाणांमध्ये या नव्या अग्निबाणाची उंची सर्वात कमी म्हणजे ४३ मीटर आहे.
असे असले तरी वजनाच्या दृष्टीने तो याआधीच्या जीएसएलव्ही एमके-२ च्या दीडपट व पीएसएलव्हीच्या दुप्पट वजनाचा आहे.
या अग्निबाणाचे डिझाईन रुबाबदार असून दोन ‘एसयूव्ही’ मोटारींएवढे वजन अंतराळात घेऊन जाण्याची त्याची क्षमता असेल.

याचा पहिला टप्पा आणि त्याला संलग्न असलेले ‘स्टार्ट-अप बूस्टर’ महाकाय असून त्यांचे वजन ६१० टन आहे. या पहिल्या टप्प्यात असलेली अनेक इंजिने एकाच वेळी चालू केली जाऊ शकतात.
याच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने पूर्णपणे देशात तयार केलेले ३० टन वजनाचे अभिनव असे ‘क्रायोजनिक इंजिन’ आहे.
अशा क्रायोजनिक इंजिनची पूर्ण अग्निबाणात बसवून प्रथमच चाचणी घेण्यात येणार आहे. यात पुढे रेटा देण्यासाठी ‘प्रॉपेलंट’ म्हणून द्रवरूप आॅक्सिजन व द्रवरूप हायड्रोजनचा प्रथमच वापर करण्यात येत आहे. १५ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.

Web Title: ISRO started preparations for the first human interval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.