मंगळ यानाच्या यशाबद्दल इस्रोला अमेरिकेचा पुरस्कार
By admin | Published: January 14, 2015 12:40 AM2015-01-14T00:40:42+5:302015-01-14T00:40:42+5:30
भारतीय अवकाश संघटना इस्रोला मंगळ यानाच्या यशाबद्दल अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीकडून स्पेस पायोनियर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Next
नवी दिल्ली : भारतीय अवकाश संघटना इस्रोला मंगळ यानाच्या यशाबद्दल अमेरिकेच्या नॅशनल स्पेस सोसायटीकडून स्पेस पायोनियर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पहिल्याच प्रयत्नात मंगळ यान मंगळाच्या कक्षेत पाठविण्यात मिळालेल्या ऐतिहासिक यशाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
२०१५ चा अवकाश पायोनियर पुरस्कार इस्रोला जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. २० मे ते २४ मे २०१५ या कालावधीत टोरंटो येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश विकास परिषदेत इस्रोच्या प्रतिनिधीला हा पुरस्कार दिला जाईल.