इस्रोतर्फे आज GSLV मार्क-3 चं प्रक्षेपण, भारतातून अंतराळवीर अवकाशात धाडणं शक्य

By admin | Published: June 5, 2017 08:55 AM2017-06-05T08:55:42+5:302017-06-05T09:49:34+5:30

जीएसएलव्ही मार्क -3 मुळे भारताला दुस-या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही, तसंच चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं भारताला शक्य होणार आहे

ISRO's launch of GSLV Mark-III launch today, allows astronauts to fly in from India | इस्रोतर्फे आज GSLV मार्क-3 चं प्रक्षेपण, भारतातून अंतराळवीर अवकाशात धाडणं शक्य

इस्रोतर्फे आज GSLV मार्क-3 चं प्रक्षेपण, भारतातून अंतराळवीर अवकाशात धाडणं शक्य

Next
ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 5 - जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण आज होणार आहे. आज 5 वाजून 8 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून इस्त्रो जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करणार आहे. जीएसएलव्ही मार्क -3 मुळे भारताला दुस-या देशावर अवलंबून राहावं लागणार नाही, तसंच चार टनाहून जास्त वजनाच्या उपग्रहांचं प्रक्षेपण करणं भारताला शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अनेक संधी निर्माण होणार आहेत. जास्त वजनाचे कम्युनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी - 19 चा जिओटीमध्ये  (जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट) प्रवेश करणे जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्धेश असल्याचं इस्त्रोचे चेअरमन ए एस किरण कुमार यांनी सांगितलं आहे.
 
जीएसएलव्ही मार्क -3 चं प्रक्षेपण करण्यासाठी जास्त वेगाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे इस्त्रोने तब्बल 30 वर्ष संशोधन करत हे इंजिन तयार केलं आहे. 
 
हे प्रक्षेपण इस्त्रोसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचं माजी प्रमुख राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे, कारण या प्रक्षेपणाद्वारे इस्त्रो प्रक्षेपण उपग्रहाची क्षमता 2.2 - 2.3 टनच्या दुप्पट करत 3.5 - 4 टन करत आहे. भारताला जर आज 2.3 टन वजनापेक्षा जास्त संपर्क उपग्रहाचं प्रक्षेपण करायचं असल्यास त्यासाठी परदेशात जावं लागंत अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली आहे. मात्र आजच्या प्रक्षेपणानंतर भारताला दुस-या देशावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही, तसंच इतर देशही आपल्याकडे येऊ लागतील. 
 

Web Title: ISRO's launch of GSLV Mark-III launch today, allows astronauts to fly in from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.