"तरुणांनी योगसाधनेचा मार्ग निवडला ही समाधानाची बाब"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:48 AM2019-03-06T04:48:34+5:302019-03-06T04:48:44+5:30
दुसऱ्यांच्या सेवेत व्यतीत केलेले जीवनच मोलाचे असते. तरुण पिढीतील अनेकांनी आज योगसाधनेचा मार्ग निवडला आहे
कोईम्बतूर : दुसऱ्यांच्या सेवेत व्यतीत केलेले जीवनच मोलाचे असते. तरुण पिढीतील अनेकांनी आज योगसाधनेचा मार्ग निवडला आहे, ही खूप समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी केले. येथील ईशा योग केंद्रात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य सांस्कृतिक सोहळ््यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. हा सोहळा आदियोगींच्या ११२ फूट उंच मूर्तीसमोर भरवला होता. सोहळ्याची सुरुवात आदियोगी, म्हणजेच आदिगुरूच्या महाआरतीने झाली. सोहळ््याच्या सुरुवातीला ईशा फाऊंडेशनचे संस्थापक, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी राष्ट्रपती आणि अन्य मान्यवरांचे स्वागत केले. योग केंद्रातील विविध स्थानांचा परिचय करून दिला. राष्ट्रपतींनी यावेळी लिंग भैरवी मंदिरालाही भेट दिली. या वेळी राष्ट्रपती कोविंद यांनी योगाच्या प्रसाराचे प्रतिक असणारा महायोग यज्ञ प्रज्वलित केला. मानवाला जीवनातील सर्वोच्च सत्यापर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या ११२ मार्गांची शिकवण देणाºया आदियोगींची गोष्ट सांगणारा ध्वनियुक्त लेझर देखावा यावेळी सादर करण्यात आला.
हा सोहळा सायंकाळी सहा वाजल्यापासून पहाटे सहावाजेपर्यत सुरु होता. यात अझरबैजान येथून आलेले संगीतकार, अनेक शास्त्रीय नर्तक व लोककलाकार आदींनी रात्रभर विविध कार्यक्रम सादर केले. यासोबत सद्गुरूंची प्रवचने व ध्यानाची सत्रही आयोजित केली होती.
लाखो भक्त मध्यरात्रीच्या ध्यानसत्रात सहभागी झाले. केंद्रात येणाºया लाखो भक्तांसाठी महा-
अन्नदान आयोजित केले होते. सोहळ्यासाठी येणाºया प्रत्येकाला एक रुद्राक्षाचा मणी व सर्पसूत्र प्रसाद म्हणून देण्यात आले. सर्पसूत्र म्हणून तांब्यापासून तयार केलेली अंगठी देण्यात आली.