कचर्‍याच्या समस्येने नागरिकांचे आरोग्य धोक्यात विधानसभेत गाजणार विषय: मनपाकडून मागविली माहिती

By admin | Published: October 25, 2016 12:44 AM2016-10-25T00:44:18+5:302016-10-25T00:44:18+5:30

जळगाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.

Issues related to the health of the people in garbage will be held in the assembly | कचर्‍याच्या समस्येने नागरिकांचे आरोग्य धोक्यात विधानसभेत गाजणार विषय: मनपाकडून मागविली माहिती

कचर्‍याच्या समस्येने नागरिकांचे आरोग्य धोक्यात विधानसभेत गाजणार विषय: मनपाकडून मागविली माहिती

Next
गाव: जळगाव तसेच राज्यातील सर्वच मनपांमध्ये कचर्‍याची समस्या निर्माण झाली असून याबाबत विधान परिषदेत तारांकीकत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने मनपाकडून यासंदर्भात माहिती मागविली आहे.
शासनाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी मनपा आयुक्तांकडून विविध मुद्यांवर माहिती मागविली आहे. त्यात मनपा क्षेत्रात कचर्‍याची समस्या निर्माण झाली आहे का? असल्यास कचर्‍यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असल्याने त्याचे विघटन करण्याची पद्धत अद्याप विकसित न झाल्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात कितपत तथ्य आहे. तसे असल्यास या कचर्‍याच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन सर्वत्र साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. हे खरे आहे का? कचर्‍याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच कचर्‍यापासून जीव निर्मिती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय? या स्वरूपात माहिती त्वरित मागविण्यात आली आहे.
मनपाचा घनकचरा प्रकल्प बंदच
मनपाचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद पडला आहे. हा प्रकल्प ताब्यात घेऊन नव्याने कार्यान्वित करण्याची कार्यवाहीदेखील मनपा प्रशासनाने केलेली नाही. त्यामुळे कचर्‍याची उघड्यावरच विल्हेवाट लावली जात आहे. तसेच बहुतांश ठिकाणी कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे वायूप्रदूषण होत आहे. त्यामुळे मनपा प्रशासन याबाबत शासनाकडे काय माहिती पाठविते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Issues related to the health of the people in garbage will be held in the assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.