धाडी गुप्त ठेवण्यासाठी आयटीने काढली ‘वरात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 05:13 AM2017-11-11T05:13:21+5:302017-11-11T05:13:52+5:30

तामिळनाडूतील अद्रमुकच्या पदच्युत नेत्या व्ही. के. शशिकला आणि त्यांचे नातेवाईक तथा मित्र यांची निवासस्थाने आणि प्रतिष्ठानांवर गुरुवारी धाडी टाकण्यासाठी प्राप्तिकर विभागाने चक्क

IT bellwether 'Warat' | धाडी गुप्त ठेवण्यासाठी आयटीने काढली ‘वरात’

धाडी गुप्त ठेवण्यासाठी आयटीने काढली ‘वरात’

googlenewsNext

चेन्नई : तामिळनाडूतील अद्रमुकच्या पदच्युत नेत्या व्ही. के. शशिकला आणि त्यांचे नातेवाईक तथा मित्र यांची निवासस्थाने आणि प्रतिष्ठानांवर गुरुवारी धाडी टाकण्यासाठी प्राप्तिकर विभागाने चक्क लग्नाच्या वरातीचे सोंग वठविले. ही कारवाई गोपनीय ठेवण्यासाठी हे सोंग वठविण्यात आले.
धाडीत सहभागी झालेल्या ३०० पेक्षा जास्त वाहनांच्या समोरच्या, तसेच पाठीमागच्या काचांवर ‘श्रीनी वेड्स माही’ अशी स्टीकर्स चिकटविण्यात आली होती. या वाहनांत प्रत्यक्षात मात्र प्राप्तिकर अधिकारी बसले होते. या गाड्यांमधून त्यांना नेमणूक दिलेल्या ठिकाणी सोडण्यात आले. नोटाबंदीनंतर टाकण्यात आलेल्या सर्व धाडींत आतापर्यंत प्राप्तिकर विभागाचीच वाहने वापरण्यात आली होती. तथापि, गुरुवारची मोहीम फारच मोठी होती. त्यामुळे विभागास वाहने भाड्याने घ्यावी लागली.
गुरुवारी नेमकी लग्नाचे मुहूर्त असल्यामुळे विभागाने तो बहाणा करून वाहने भाड्याने घेतली आणि शेवटपर्यंत हे नाटक वठविले. अधिकाºयांना नियोजित स्थळी सोडेपर्यंत वाहनचालकांना त्यांचे मोबाइल वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. वाहन बुक करतानाच ही अट टाकण्यात आली होती.
या मोहिमेस सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी तामिळनाडू पोलिसांवरच सोपविण्यात आली होती. जया टीव्हीच्या कार्यालयात अधिकारी आले, तेव्हा-तेव्हा तेथे मोठा जमाव जमला. त्याला नियंत्रणात ठेवण्याचे काम पोलिसांनीच केले. यापूर्वी तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सी. विजय भास्कर आणि माजी मुख्य सचिव रामा मोहन राव यांच्याविरोधात धाडी टाकण्यात आल्या होत्या, तेव्हा प्राप्तिकर विभागाने केंद्रीय राखीव पोलीस दलाची मदत घेतली होती. कारण तेव्हा तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव होता. या वेळी दोन्ही सरकारे एकमेकांच्या सोबत होती. त्यामुळे राज्य पोलिसांची सुरक्षा पुरेशी होती. (वृत्तसंस्था)
 

Web Title: IT bellwether 'Warat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.