याला न्याय म्हणता येणार नाही - झाकीया जाफरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2016 12:26 PM2016-06-17T12:26:19+5:302016-06-17T12:26:19+5:30

गुलबर्ग सोसायटी प्रकरणात न्यायालयाच्या निकालाने माझे समाधान झालेले नाही. मी माझ्या वकिलांबरोबर पुन्हा चर्चा करेन.

It can not be said justice - Zakia Jafri | याला न्याय म्हणता येणार नाही - झाकीया जाफरी

याला न्याय म्हणता येणार नाही - झाकीया जाफरी

Next
ऑनलाइन लोकमत 
अहमदाबाद, दि. १७ - गुलबर्ग सोसायटी प्रकरणात न्यायालयाच्या निकालाने माझे समाधान झालेले नाही. मी माझ्या वकिलांबरोबर पुन्हा चर्चा करेन. याला न्याय म्हणता येणार नाही. अशी प्रतिक्रिया झाकीया जाफरी यांनी न्यायालयाच्या निकालावर बोलताना दिली. 
 
गुजरात दंगलीमध्ये गुलबर्ग सोसायटीवर जमावाने हल्ला केला होता. त्यावेळी हिंसक जमावाने झाकीया यांचे पती काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांची हत्या केली होती. इतक्या लोकांची हत्या झाल्यानंतर १२ आरोपीचं दोषी कसे ?. माझी लढाई इथे संपलेली नाही. सर्वांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. 
 
गुलबर्गा जळीतकांड प्रकरण - ११ दोषींना जन्मठेप तर १० जणांना सात वर्ष कारावासाची शिक्षा
 
याप्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या तीस्ता सटेलवाड यांनीही निकालावर समाधानी नसल्याचे म्हटले आहे. आम्ही निकालाचे स्वागत करतो पण आम्ही निराश आहोत. ज्यांना कमी शिक्षा झाली आहे त्यांच्या शिक्षेला पुन्हा आव्हान देऊ असे सटेलवाड यांनी सांगितले. 
 

 

Web Title: It can not be said justice - Zakia Jafri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.