दिल्लीतील अतिरेकी कट हा बनाव असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:41 IST2018-01-09T23:40:49+5:302018-01-09T23:41:12+5:30
काश्मीरमधील तरूण बिलाल अहमद वणी याने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तसेच तेथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना होती, असे सांगताच पोलीस हादरून गेले खरे; पण आपणास फसवणा-या दोघांना अडकावण्यास बिलालने असा बनाव रचला होता, असे उघडकीस आले आहे.

दिल्लीतील अतिरेकी कट हा बनाव असल्याचे उघड
नवी दिल्ली : काश्मीरमधील तरूण बिलाल अहमद वणी याने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत तसेच तेथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची योजना होती, असे सांगताच पोलीस हादरून गेले खरे; पण आपणास फसवणा-या दोघांना अडकावण्यास बिलालने असा बनाव रचला होता, असे उघडकीस आले आहे.
भोपाळ शताब्दी एक्स्प्रेसमधून मथुरा येथे विनातिकीट प्रवास करणाºया एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. बिलाल वणी असे त्याचे नाव होते. त्याची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली, तेव्हा त्याने दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे आणि आपले दोन सहकारी दिल्लीत जामा मशिदजवळील एका हॉटेलमध्ये आहेत, असे वणी याने सांगितले.