बँकांमध्ये केवळ २४ टक्केच ‘लक्ष्मी’; महानगरांमध्ये अधिक प्रमाण, बँक ठेवींमध्येही पुरुषांच्या तुलनेत मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 11:32 AM2023-03-30T11:32:11+5:302023-03-30T11:32:26+5:30
कोणत्याही बँकेत गेले की तेथे महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते.
नवी दिल्ली : कोणत्याही बँकेत गेले की तेथे महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात हे सत्य नसल्याचे समोर आले आहे. सरकारी अहवालानुसार, देशभरात बँकांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या केवळ २४.१७ टक्के असल्याचे समोर आले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या सर्वेक्षणाचा आधार घेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने तयार केलेल्या वुमन अँड मेन अहवालानुसार, विविध बँक-समूहांमध्ये विविध स्तरांवर नोकरी करणाऱ्या महिलांची टक्केवारी काढण्यात आली आहे. यानुसार २०२३ च्या जानेवारीपर्यंत बँकेत अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलांची संख्या २२.९७ टक्के असून, क्लार्क म्हणून ३०.७४ टक्के महिला काम करत आहेत. कनिष्ठ कर्मचारी म्हणून १६.४० टक्के महिला काम करत आहेत. त्यामुळे बँकांमध्ये कर्मचारी म्हणून पुरुषांची मक्तेदारी असल्याचे समोर येते.
महाराष्ट्रात काय?
महाराष्ट्रात २,१८,५८८ पुरुषांची व्यक्तिगत खाती असून, यात १२,८२,९६३ कोटी रुपयांची रक्कम जमा. महाराष्ट्रात महिलांची ७४७४८.३२ टक्के व्यक्तिगत खाती असून, एकूण रक्कम ४६३०४२ इतकी जमा आहे.
ग्रामीण भागातील विदेशी भागात क्लार्क म्हणून महिला ४२.८६% इतकी अधिक आहे. याचवेळी कनिष्ठ कर्मचारी म्हणूनही महिलांना तितकेच स्थान आहे. शहरी भागांत विदेशी बँकांत महिलांचे २३.१३% इतकेच आहे. याचवेळी कनिष्ठ कर्मचारी म्हणूनही महिलांना नियुक्तीही देण्यात आलेली नाही. महानगरांमध्ये विदेशी बँकांमध्ये अधिकारी म्हणून ३०.८७%, क्लर्क म्हणून ४६.५६ टक्के महिला कार्यरत आहेत.
कोणत्या राज्यात बॅंकेत
अधिक महिला कर्मचारी?
राज्य एकूण महिला
बिहार ६०,३८३ ७६३४
अरुणाचल १०९८ २३५
आंध्र प्रदेश ६२,१३६ १५,०७६
दिल्ली ६८७१८ १९८८२
गोवा ५१५९ १९७२
केरळ ६७००९ २८९१०
महाराष्ट्र २७१८६७ ७७१६४
गुजरात ९१३१९ १७२६८