ही पाल वाढविते पौरुषत्व, किंमत ४० लाख

By admin | Published: June 22, 2017 01:49 AM2017-06-22T01:49:47+5:302017-06-22T01:49:47+5:30

आपण घरात नेहमीच पाल पाहतो. आपल्याला तिची किळस वाटते; परंतु एक पाल अशी आहे जिची किळस आली तरी तुम्हाला ती हवीहवीसी वाटेल.

It increases the virility, price 40 million | ही पाल वाढविते पौरुषत्व, किंमत ४० लाख

ही पाल वाढविते पौरुषत्व, किंमत ४० लाख

Next

नवी दिल्ली : आपण घरात नेहमीच पाल पाहतो. आपल्याला तिची किळस वाटते; परंतु एक पाल अशी आहे जिची किळस आली तरी तुम्हाला ती हवीहवीसी वाटेल. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत आहे तब्बल ४० लाख रुपये. या दुर्मिळ पालीचे नाव आहे गेक्को. औषधीय गुणांनी युक्त असल्यामुळे गेक्कोला आग्नेय आशिया देशांत प्रचंड मागणी आहे. ही पाल ‘टॉक-के’सारख्या शब्दाचा आवाज काढते. त्यामुळे तिचे ‘टॉके’ असेही नाव पडले आहे. या पालींचे मांस औषधनिर्मितीसाठी वापरले जाते. आग्नेय आशियाई देशांत ‘टॉके’च्या मांसाचा उपयोग करून नपुंसकता, मधुमेह, एड्स आणि कर्करोग आदी रोगांवरील पारंपरिक औषधे तयार करण्यात येतात. पौरुषत्व वाढविण्यासाठीही ‘टॉके’चा उपयोग केला जातो, असे सांगण्यात येते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात या पालीची किंमत ४० लाख रुपये आहे. ‘टॉके’ पाल बिहार, इंडोनेशिया, बांगलादेश, ईशान्य भारत, फिलिपिन्स आणि नेपाळमध्ये आढळून येते. जंगलतोडीमुळे ही पाल लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

Web Title: It increases the virility, price 40 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.