गृहिणींचे योगदान पैशात मोजणे कठीण! सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला झापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 10:01 AM2024-02-19T10:01:40+5:302024-02-19T10:01:53+5:30

गृहिणी दिवसभरात घरात असते याचा असा अर्थ नाही की ती काहीच काम करीत नाही.

It is difficult to measure the contribution of housewives in money! The Supreme Court overruled the High Court | गृहिणींचे योगदान पैशात मोजणे कठीण! सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला झापले

गृहिणींचे योगदान पैशात मोजणे कठीण! सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला झापले

नवी दिल्ली : गृहिणी दिवसभरात घरात असते याचा असा अर्थ नाही की ती काहीच काम करीत नाही. महिलेने घरात केलेल्या कामाचे मूल्य ऑफिसमधून पगार मिळविणाऱ्यापेक्षा कमी नाही. घराची काळजी घेणाऱ्या महिलेची भूमिका उच्च दर्जाची असते. तिचे योगदान पैशात मोजणे कठीण आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने १७ वर्षांपूर्वी एका रस्ता अपघातात महिलेच्या मृत्यूशी संबंधित मोटार अपघात दाव्याची सुनावणी करताना ही टिप्पणी केली.

कमी लेखू नका

उच्च न्यायालयाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयाने विरोध केला. असा दृष्टिकोन अवलंबल्याबद्दल न्यायालयाने उच्च न्यायालयाला फटकारले.

न्यायालयाने म्हटले आहे की, एका गृहिणीचे उत्पन्न रोजंदारी कामगारापेक्षा कमी कसे मानले जाऊ शकते? गृहिणीच्या कामाचे मूल्य कधीही कमी लेखू नये.

कोर्ट म्हणाले : न्यायाधीकरण, न्यायालयांनी मोटार अपघात दाव्यांच्या खटल्यांमध्ये गृहिणींचे काम, श्रम आणि त्यागाच्या आधारावर त्यांच्या अंदाजे उत्पन्नाची गणना करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.  न्यायाधिकरणाने अडीच लाखांची भरपाई देण्याचा आदेश दिला होता.

रोजंदारी कामगारापेक्षा कमी उत्पन्नावर कोर्ट म्हणाले...

अपिलावर, उच्च न्यायालयाला गृहिणी असल्याच्या आधारे दाव्याची गणना करताना ट्रिब्युनलच्या आदेशात कोणतीही चूक आढळली नाही ज्यामध्ये महिलेचे अंदाजे उत्पन्न रोजंदारी कामगारापेक्षा कमी मानले गेले होते.

अपील स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने नुकसानभरपाईची रक्कम सहा लाख रुपये केली आणि सहा आठवड्यांच्या आत मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे निर्देश दिले.

 कुटुंबात गृहिणीची भूमिका तितकीच महत्त्वाची असते, जितकी ऑफिसमधून पगार मिळविणाऱ्याची असते. गृहिणीचे काम एक एक करून मोजले तर निःसंशयपणे तिचे योगदान अमूल्य ठरेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

Web Title: It is difficult to measure the contribution of housewives in money! The Supreme Court overruled the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.