"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:49 AM2022-04-05T09:49:51+5:302022-04-05T09:53:30+5:30

BJP Subramanian Swamy And Fuel Hike : भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

It is intellectual bankruptcy of the Finance Ministry to do this. It is also anti national says BJP Subramanian Swamy | "इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर 

"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी"; भाजपा नेत्याचा घरचा आहेर 

Next

मुंबई - महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाही. विशेष म्हणजे गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. त्यामुळेच, आज पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या दरवाढीतून पेट्रोलच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी (BJP Subramanian Swamy) यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

"इंधन दरवाढ करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी, हे देशविरोधी" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. सुब्रहमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने देशात बंडखोरीची परिस्थिती निर्माण होत आहे. हे करणे ही अर्थ मंत्रालयाची बौद्धिक दिवाळखोरी आहे. हे देशविरोधीही आहे. या किमती वाढवून अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे ही निव्वळ अक्षमता आहे"असं सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे ८० पैशांची वाढ करण्यात आली. नवीन दरवाढीनुसार पेट्रोल आणि डिझलेच्या किंमती राजधानी दिल्लीत १०४.६१ आणि ९५.८७ रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ११९.६७ आणि डिझेल १०३.९२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे गेल्या 2 आठवड्यात इंधनाची दरवाढ तब्बल 9 ते 10 रुपयांनी झाली आहे. त्यामुळे, महागाईला आटोक्यात आणण्यास सरकार सपशेल अपयशी ठरत आहे. निवडणूक काळात तब्बल 2 ते 3 महिने पेट्रोलच्या दरात काहीही बदल झाला नाही. दरवाढ कुठेही दिसली नाही. मात्र, निवडणुकांचे निकाल हाती येताच, 25 दिवसांत 10 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. 

महाराष्ट्रात परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोलचे दर सर्वोच्च आहेत. सोमवारी येथे पेट्रोल १२१.२३ रुपये, तर डिझेल १०१.४२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. सुमारे साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्चपासून त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. गेल्या १४ दिवसांपैकी १२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Web Title: It is intellectual bankruptcy of the Finance Ministry to do this. It is also anti national says BJP Subramanian Swamy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.