IT कंपन्यांमधील नोकर कपात सुरूच, आता Microsoft मधील १००० जणांना काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 07:29 PM2022-10-18T19:29:51+5:302022-10-18T19:31:11+5:30

आर्थिक मंदीचा परिणाम जगावर स्पष्टपणे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत.

it jobs cut microsoft to fire 1000 employees | IT कंपन्यांमधील नोकर कपात सुरूच, आता Microsoft मधील १००० जणांना काढलं!

IT कंपन्यांमधील नोकर कपात सुरूच, आता Microsoft मधील १००० जणांना काढलं!

googlenewsNext

आर्थिक मंदीचा परिणाम जगावर स्पष्टपणे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या बहुराष्ट्रीय आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. मग ते फेसबुक असो, अॅपल असो, गुगल असो किंवा इतर कोणतीही कंपनी असो. आता मायक्रोसॉफ्टही यात सामील झाली आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये 1000 लोकांच्या नोकऱ्या जाणार असल्याची बातमी आहे. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली या कंपन्या लोकांना नोकरीवरून काढून टाकत आहेत. मायक्रोसॉफ्ट विविध विभागांतील लोकांना काढून टाकण्याची तयारी करत आहे. 

Axios च्या रिपोर्टनुसार, कंपनीने स्वतः ही माहिती दिली आहे. मात्र, किती लोकांच्या नोकऱ्या काढून घेतल्या जात आहेत, हे सांगण्यास मायक्रोसॉफ्टने थेट नकार दिला. पण सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याचे कंपनीतील सूत्रांचे म्हणणे आहे. अहवालातील दाव्यानुसार मायक्रोसॉफ्ट जगातील अनेक भागांमध्ये, टीम आणि विविध स्तरांवर लोकांना कामावरून काढून टाकत आहे. ट्विटर आणि ब्लाइंड सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर लोक जॉब कटबद्दल बोलत आहेत. 

Jobs Cut मायक्रोसॉफ्टने काय म्हटले?
Axios सोबतच्या संभाषणात मायक्रोसॉफ्टने नोकर कपातीवर आपली प्रतिक्रिया दिली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इतर कंपन्यांप्रमाणे आम्हीही आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यक्रमांचा सातत्याने आढावा घेत असतो. त्यानंतर आवश्यक ते बदल करतो. आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करणे सुरूच ठेवू आणि येत्या काही वर्षांत महत्त्वाच्या क्षेत्रात काम करणार आहोत, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. 

Web Title: it jobs cut microsoft to fire 1000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.