प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:38 AM2018-05-06T01:38:50+5:302018-05-06T01:38:50+5:30
घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणा-या उच्च शिक्षण संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अखिल भारतीय उच्च शिक्षण परिषद (एआयसीटीई) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास मूळ कागदपत्रे व भरलेले शुल्क विद्यार्थ्याला परत करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली - घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणा-या उच्च शिक्षण संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अखिल भारतीय उच्च शिक्षण परिषद (एआयसीटीई) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास मूळ कागदपत्रे व भरलेले शुल्क विद्यार्थ्याला परत करणे आवश्यक आहे.
अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना हे शुल्क परत देत नाहीत वा मोठी कपात करून तुटपुंजे शुल्क परत देतात. त्यांच्यावर आता कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या संस्थेत व अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा हक्क आहे, अशीही माहिती अधिकाºयाने दिली.