खासगी शाळांत राष्ट्रगीत गाण्याची सक्ती असावी

By admin | Published: March 6, 2016 03:20 AM2016-03-06T03:20:56+5:302016-03-06T03:20:56+5:30

तामिळनाडूतील सर्व खासगी शाळांमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गायले गेले पाहिजे, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

It is mandatory to sing the national anthem in private schools | खासगी शाळांत राष्ट्रगीत गाण्याची सक्ती असावी

खासगी शाळांत राष्ट्रगीत गाण्याची सक्ती असावी

Next

चेन्नई : तामिळनाडूतील सर्व खासगी शाळांमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गायले गेले पाहिजे, असा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम.एम. सुंदरेश यांनी शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान उपरोक्त निर्देश दिले. माजी सैनिक एन. सेल्वतिरुमल यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी खंडपीठाने खासगी शाळांनी अभ्यासक्रमाच्या रूपात राष्ट्रगीत गाण्याचा पायंडा पाडावा, असे स्पष्ट केले. सोबतच यासंदर्भात सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर राज्यातील सर्व खासगी शाळांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते की नाही, याची शहानिशा करण्याचे आदेशही न्यायालयाने केंद्रीय आणि राज्य माध्यमिक शिक्षण तसेच मनुष्यबळ विकास विभागाला दिले.
तामिळनाडूतील बहुतांश खासगी शाळांमधून राष्ट्रगीत गायले जात नाही. याउलट केंद्रीय आणि राज्य सरकारच्या शाळांमध्ये दररोज राष्ट्रगीत गायले जाते, याकडे सेल्वतिरुमल यांनी लक्ष वेधले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: It is mandatory to sing the national anthem in private schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.