नव्या पिढीत कलागुण रूजवणे आवश्यक : सावळ
By admin | Published: May 5, 2015 01:21 AM2015-05-05T01:21:43+5:302015-05-05T01:21:43+5:30
डिचोली : ज्या कलेत किंवा क्षेत्रात आपण कार्य करतो त्या कलेत वा क्षेत्रात आपण अव्वल क्रमांकावर जाणार त्याच प्रखर इच्छेने आपण पुढे जात असताना स्वत:ला कधीही कमी लेखू नये. भजन, किर्तन सोडून आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आकर्षण होत आहे. या स्थितीत आज युवा कलाकारांना या कलेकडे आकर्षित करून त्याचंया या कलेचे गुण रुजविणे आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी कुडणे येथे कै. पं. मधुकर च्यारी स्मरणार्थ आयोजित संगीत संमेलनाच्या उद्गाघटन प्रसंगी केले.
Next
ड चोली : ज्या कलेत किंवा क्षेत्रात आपण कार्य करतो त्या कलेत वा क्षेत्रात आपण अव्वल क्रमांकावर जाणार त्याच प्रखर इच्छेने आपण पुढे जात असताना स्वत:ला कधीही कमी लेखू नये. भजन, किर्तन सोडून आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त आकर्षण होत आहे. या स्थितीत आज युवा कलाकारांना या कलेकडे आकर्षित करून त्याचंया या कलेचे गुण रुजविणे आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी कुडणे येथे कै. पं. मधुकर च्यारी स्मरणार्थ आयोजित संगीत संमेलनाच्या उद्गाघटन प्रसंगी केले. साखळी येथील ओंकार क्रिएशन सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे श्री कुडणेश्वर देवस्थान मंडप कुडणे-साखळी येथे आयोजित या संगीत संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कुडचणेचे प्रभारी सरपंच सुरेश कामत, पाळीच्या झेडपी सदस्या शुभेच्छा गावस, कुडणेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष भिवा मळीक, माधवी च्यारी, ओंकार क्रिएशनच्या अध्यक्षा निशा पोकळे आदींची उपस्थिती होती. आपल्या कलेतील प्राविण्य जनमानसात रूजविताना तसेच सर्वत्र ठसा उमटविताना आपल्याबरोबर कुटुंबाचे व गावचे नाव पुढे आणणारा, गावाला ओळख देणारे व्यक्तीमत्व श्रेष्ठ असते. आज संगीत रंगभूमी ओस पडत चालली आहे. संगीत नाटकांचा मोठा अवधी आजच्या रसिकांना पचनी पडत नसल्याने प्रेक्षकांची या नाटकांकडे पाठ होत आहे. आजच्या समाजाची मानसिकता ओळखून प्रत्येक गोष्टीत समयसुचकता आणणे गरजेचे आहे. तसेच कलाकाराने आपली कला पुढे नेत असताना त्या कलाकाराला प्रोत्साहन देऊन त्याच्या कलेचे संवर्धन कला रसिक प्रेक्षक तसेच गावातील लोकांचेही कर्तव् व जबाबदारी आहे, असे आमदार नरेश सावळ यांनी पुढे म्हटले. आज कलेच्या क्षेत्रात येणारे कलाकार नगण्यच ----------- जातो. तरूण मोठ्या पदव्या व नोकरीच्या मागे लागत आहे. मात्र उदयोन्मुख कलाकारांनी कलेच्या क्षेत्राकडे भविष्य, करियर म्हणून पहावे. ओंकार क्रिएशन सारख्या संस्थांनी अशा प्रकारचे कला संस्कृती संवर्धनाचे उपक्रम राबवावे, असे आवाहन जिल्हा पंचायत सदस्य शुभेच्छा गावस यांनी केले. कुडणे गावात अनेक कलाकार आज नावारूपास येत असल्याने त्यांना कै. पं. मधुकर च्यारी यांनी प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी आपल्याबरोबरच गावाच्या नावाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे, असे प्रभारी सरपंच सुरेश कामत यांनी म्हटले. यावेळी ज्येष्ठ संगीत कलाकार प्रभाकर मळीक, यशवंत खांडेकर, घन:श्याम माडकर व भगवंत मळीक यांचा आमदार सावळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समई प्रज्वलनाने या संगीत संमेलनाचे उद्घाटन करण्यत आले. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष निशा पोकळे यांनी केले. सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी तर सचिव सुषमा सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर संगीत संमेलनास प्रारंभ करण्यात आला. अनेक गायक, वादक कलाकारांनी आपापल्या कलेची प्रतिभा या संमेलनात सादर केली व उपस्थितांची वाहवा मिळविली. फोटो : कै. पं. मधुकर च्यारी स्मृती संगीत संमेलनाचे उद्घाटन करताना आमदार नरेश सावळ, बाजूला शुभेच्छा गावस, निशा पोकळे, माधव च्यारी, सिद्धार्थ मळीक, सुरेश कामत, भिवा मळीक व इतर. २) संमेलनात सत्कार करण्यात आलेल्या ज्येष्ठ कलाकार प्रभाकर मळीक, यशवंत खांडेकर, धन:श्याम माडकर व भगवंत मळीक यांच्या समवेत आमदार नरेश सावळ, शुभेच्छा गावस, निशा पोकळे व इतर. ३) संमेलनाच्या उद्घाटनानंतर भजन सादर करताना गणेश पार्सेकर, विठ्ठल शिरोडकर, प्रकाश कोरगावकर व साथी कलाकार. (छाया : विशांत वझे)