संसद वारंवार तहकूब होणे देशहिताचे नाही : व्यंकय्या नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:34 AM2017-12-23T01:34:48+5:302017-12-23T01:35:43+5:30
संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.
नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब झाल्याबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त करून सभागृह अधूनमधून सुरू असणे हे काही देशाच्या हिताचे नाही, असे म्हटले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्याचा आग्रह काँग्रेसने कायम ठेवल्यामुळे शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गुरुवारी काँग्रेसच्या याच ठाम भूमिकेमुळे सभागृहात कामकाज बंद पडले व त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांना त्यांचे सभागृहातील पहिले भाषणही करता आले नव्हते.
संसदेचे कामकाज सध्या सुरू असते ते अधूनमधूनच. हे काही देशाच्या हिताचे नाही, असे नायडू म्हणाले. ते येथे इंटरनॅशनल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर आणि इंटेग्रेटेड ट्रान्झिट कॉरीडॉर डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या पायाभरणी समारंभात बोलत होते. नायडू
म्हणाले, सर्वांना सामावून घेणाºया आर्थिक विकासाची भूमिका घेऊन भारताला जागतिक आर्थिक नेता बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील.
एकोप्याने राहण्याची संस्कृती-
देशावर पूर्वी झालेल्या आक्रमणांचा उल्लेख करून नायडू म्हणाले की या देशाची संस्कृती दहा हजार वर्षांची असून भारताने कोणावर कधी आक्रमण केल्याची नोंद नाही.
आम्ही एकोप्याने राहू इच्छितो. आक्रमणापूर्वी जगाच्या सकल देशी उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा २७ टक्के होता.
लवकरात लवकर आर्थिक विकास ७.५ टक्क्यांच्या पलीकडे नेऊन दोन दोन आकडी होण्यासाठी आम्ही सगळ््यांनी काम केले पाहिजे, याचा विसर पडू नये, असे ते म्हणाले.