बेंगळुरूमध्ये फ्लॅटमध्ये IT चा छापा, २१ बॉक्समध्ये भरलेली रोकड जप्त; मोठं घबाड सापडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:13 AM2023-10-13T09:13:17+5:302023-10-13T09:13:44+5:30
आयकर विभागाने रात्री उशिरा बेंगळुरूमधील एका फ्लॅटवर छापा टाकला.
बेंगळुरूमध्ये आयकर विभागाने एका फ्लॅटमध्ये छापा टाकला. यात आयकर विभागाने करोडो रुपयांची रोकड जप्त केली आहे. आयकर विभागाने काल माजी काँग्रेसचे माजी नगरसेवकांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी छापे टाकले. बेंगळुरू येथील आरटीनगर येथील दोन ठिकाणी छापे टाकले.
माजी नगरसेवक अश्वथम्मा यांच्या नातेवाईकाच्या फ्लॅटमधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकार्यांनी आता आरटी नगर येथील आत्मानंद कॉलनीमध्ये कार्टन बॉक्समध्ये पॅक केलेले कोट्यवधी रुपये जप्त केले आहेत. आयकर विभागाने गुरुवारी बेंगळुरूमध्ये करचुकवेगिरीच्या संशयावरून अनेक ठिकाणी छापे टाकले होते आणि यावेळी ही रोकड जप्त करण्यात आली.
...तेव्हा उद्धव ठाकरेंची भाजपासोबत जायची इच्छा होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
याआधी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मल्लेश्वरम, सदाशिव नगर, डॉलर्स कॉलनी, मठीकेरे आणि सर्जापुरा रोडसह शहरातील १० हून अधिक भागांतील ज्वेलर्सच्या मालकांच्या घरांना आणि कार्यालयांना भेटी दिल्या आणि ज्वेलर्सचे रेकॉर्ड तपासले.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सोन्याचे दागिने विक्रेत्यांवर आयटी छापे टाकले होते. मागील छाप्यादरम्यान जप्त केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, अधिकार्यांनी आयकर उल्लंघनाच्या संदर्भात बेंगळुरूमध्ये छापे टाकले.