भारताला सदस्यत्व न मिळणे खेदजनक
By admin | Published: October 25, 2015 11:22 PM2015-10-25T23:22:44+5:302015-10-25T23:22:44+5:30
भारत आणि आफ्रिका खंडाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायम सदस्यत्व न मिळणे हे समजण्यापलीकडे आहे
नवी दिल्ली : भारत आणि आफ्रिका खंडाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) कायम सदस्यत्व न मिळणे हे समजण्यापलीकडे आहे, असे सांगत विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी सुरक्षा परिषदेत सुधारणांची गरज अधोरेखित केली.
लोकसंख्या पाहता सर्वात मोठा खंड असतानाही आफ्रिकेला आणि जगातील लोकसंख्येचा सहावा भाग असलेल्या भारताला सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळू न शकणे ही खेदाची बाब आहे, असे त्या तिसऱ्या भारत- आफ्रिका संपादक फोरमचे उद्घाटन करताना म्हणाल्या. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणा हा मोठा मुद्दा आहे. १९४५ पासून जागतिक व्यवस्थेत सुरक्षा परिषद ही प्रातिनिधिक बनली आहे. लोकसंख्येत सर्वात मोठा खंड ही विसंगती दूर करण्यासाठी आफ्रिका आणि भारताला एकजुटीने काम करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, दिल्लीतील डिप्लोमेटिक एन्क्लेव्हमध्ये भारत-आफ्रिकेच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाणाऱ्या ‘रोझ गार्डन’चे त्यांनी उद्घाटन केले. आफ्रिका नव्या संधी प्रदान करणारे क्षेत्र बनले असून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकजुटीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.