पाकला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ - बिपिन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 09:40 PM2018-09-22T21:40:12+5:302018-09-22T21:44:36+5:30
पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी यांच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमानुष कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे सांगितले.
नवी दिल्ली: पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवादी यांच्याकडून जम्मू- काश्मीरमध्ये सुरु असलेल्या अमानुष कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे, असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी शनिवारी येथे सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या घटनांचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलताना जनरल बिपिन रावत म्हणाले की, दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यांच्यासारखा अमानुषपणा न करताही त्यांनाही आपल्यासारखे क्लेष जाणवायला हवेत.
We need to take stern action to avenge the barbarism that terrorists & the Pakistan Army have been carrying out. Yes,it's time to give it back to them in the same coin, not resorting to similar kind of barbarism. But I think the other side must also feel the same pain: Army Chief pic.twitter.com/NlNxahL504
— ANI (@ANI) September 22, 2018
तसेच, पाकिस्तानकडून दहशतवादास खतपाणी घालणे सुरु असेपर्यंत त्या देशाशी बोलणी केली जाऊ शकत नाहीत, या सरकारी भूमिकेचा लष्करप्रमुखांनी पुनरुच्चार केला.
We continuously need modern weapons. There is a limit till which we can use a particular weapon, & as new technologies come, we also want them to be included in our forces. So buying of weapons continue: Army Chief General Bipin Rawat pic.twitter.com/2xF8YEZmYt
— ANI (@ANI) September 22, 2018
I don't want to comment on political issues. But I'll like to say that we're getting full cooperation. We're given freedom on how to carry out our operations. And you can see its effect in Kashmir & North-east:Army Chief on being asked about Army being used in political campaigns pic.twitter.com/rZpzYPg03S
— ANI (@ANI) September 22, 2018