आधीच ठरलं होतं वाटेत कुणी रस्त्यात आलं तर उडवायचं, चिमुकल्याला कारखाली चिरडणाऱ्यांची धक्कादायक कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:49 PM2023-11-23T21:49:03+5:302023-11-23T21:49:24+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये तैनात असलेल्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांचा मुलगा नामिश याच्या मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये तैनात असलेल्या अॅडिशनल एसपी श्वेता श्रीवास्तव यांचा मुलगा नामिश याच्या मृत्यूच्या घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नामिश याला कारखाली चिरडणारे आरोपी सार्थक सिंह आणि देवश्री वर्मा यांनी पोलीस चौकशीमध्ये धक्कादायक कबुली दिली आहे. जेव्हा रेस लावली तेव्हाच रस्त्यात कुणी आलं तर उडवायचं, असं आरोपी सार्थक याने देवश्रीला सांगितलं होतं. त्यामुळेच आरोपी वाटेत आलेल्या चिमुकल्याला चिरडत पुढे गेली.
श्रीवातस्तव यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी दोन्ही आरोपांना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, रेस लावल्यानंतर कुणी मध्ये आल्यास, ब्रेक लावायचा नाही, तर त्याला उडवायचं असं ठरलं होतं. त्यांनी तेच केलं. त्यानंतर ते रस्त्याच्याकडेने स्केटिंग करत असलेल्या नमिशला चिरडून सुसाट पुढे गेले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा नंबरही ट्रेस होत नव्हता. आता आपल्याला सपा नेते असलेले वडील रवींद्र सिंह वाचवतील, असं यातील एका आरोपींला वाटत होतं. त्यामुळेच त्यांनी घरी गेल्यावर सर्वात आधी या घटनेची माहिती दिली होती. दोन्ही आरोपींनी ज्या पद्धतीने धडक दिली आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध नव्हतं, त्यामुळे आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाही, असं आरोपींना वाटत होतं, अशी माहिती एडीसीपी पूर्व विभाग सय्यद अली अब्बास यांनी सांगितले.
ही घटना घडली तेव्हा कारमध्ये असलेले सार्थक सिंह आणि देवश्री वर्मा यांनी कबूल केले की, धडक एवढी जोरदार होती की मुलगा वाचणार नाही, हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे ते घटनास्थळावरून फरार झाले. हा अपघात जिथे घडला तिथे सीसीटीव्ही नव्हता. मात्र काही अंतरावर असलेल्या चहाच्या दुकानाजवळील सीसीटीव्हीच्या मदतीने एसयूव्हीची ओळख पटवण्यात आली.