30 जूनच्या मध्यरात्री झाला जन्म! नाव ठेवलं जीएसटी
By admin | Published: July 2, 2017 07:38 AM2017-07-02T07:38:31+5:302017-07-02T07:42:30+5:30
एखादी प्रसिद्ध व्यक्ती, घटना यांच्या नावांवरून नवजात मुलांचे नामकरण करणे नवीन नाही. नुकतेच लागू झालेली जीएसटी करप्रणालीसुद्धा
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 2 - एखादी प्रसिद्ध व्यक्ती, घटना यांच्या नावांवरून नवजात मुलांचे नामकरण करणे नवीन नाही. नुकतेच लागू झालेली जीएसटी करप्रणालीसुद्धा याला अपवाद ठरलेली नाही. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटी लागू करण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच राजस्थानमध्ये एका मुलाने जन्म घेतला. देशातील करप्रणालीत झालेल्या क्रांतिकारी बदलाच्या ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आनंदीत झालेल्या आईने त्याचे नाव जीएसटी ठेवण्याचा निर्णय घेतला.
राजस्थानमधील ब्यावर येथे काल मध्यरात्री बरोब्बर 12 वाजून 2 मिनिटांनी एका मुलाने जन्म घेतला. हा मुलगा आणि त्याच्या आईचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ऐतिहासिक क्षणी मुलाचा जन्म झाल्याने आई आनंदीत दिसत आहे. तसेच या मुलाचे नाव जीएसटी असे ठेवत आईने मुलाचा जन्म अविस्मरणीय बनवला आहे.
देशभरात बहुप्रतीक्षित जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा करप्रणाली अखेर कालपासून लागू झाली. शुक्रवारी मध्यरात्री बरोबर 12 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमधून पूर्ण देशात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जीएसटीच्या निमित्ताने आर्थिक सुधारणांच्या नव्या मार्गावर देश वाटचाल करणार आहे. हा खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स आहे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ग्वाहीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अप्रत्यक्ष दुजोरा देत चौदा वर्षांची एक यात्रा सफळ संपूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली होती.