पुतण्याच्या सेक्स स्कँडलचे व्हिडीओ त्यांनीच पसरवले; शिवकुमार यांचा उलटा कुमारस्वामींवरच आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 09:35 AM2024-05-09T09:35:25+5:302024-05-09T09:35:37+5:30
मंत्रिमंडळातून शिवकुमार यांना बडतर्फ करा या कुमारस्वामींच्या मागणीवर त्यांनी त्यांनी हा आरोप केला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार हे कथित सेक्स व्हिडिओ सर्वांना पाठविण्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.
चिकमगलुरू : जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनीच हासनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा समावेश असलेल्या सेक्स स्कॅडलचे व्हिडीओ सर्वांना पाठवले. ते ब्लॅक मेलिंगमध्ये तज्ज्ञ असून, ते या कथेचे मुख्य पात्र, दिग्दर्शक आणि निर्माता असल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी केला आहे.
मंत्रिमंडळातून शिवकुमार यांना बडतर्फ करा या कुमारस्वामींच्या मागणीवर त्यांनी त्यांनी हा आरोप केला आहे. कुमारस्वामी यांनी शिवकुमार हे कथित सेक्स व्हिडिओ सर्वांना पाठविण्यातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता.
उडाली राजकीय खळबळ
कुमारस्वामी यांचा पुतण्या आणि जेडीएस खासदार रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले असून, या प्रकरणामुळे कर्नाटकात राजकीय खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप-जेडीएस यांच्या शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एनडीए आणि जेडीएसने हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.
कोठडीत वाढ
अपहरणाच्या आरोपाचा सामना करत असलेले कर्नाटक जेडीएस आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना बेंगळूरू येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. रेवण्णाला अपहरणाच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने ताब्यात घेतले होते.
महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून माजी मंत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आमदाराचा मुलगा आणि खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी त्याच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारदाराने केला होता.
कुमारस्वामी यांना अश्लील व्हिडिओ क्लिप असलेल्या पेन ड्राईव्ह प्रकरणाची पूर्ण माहिती होती. कुमारस्वामी ब्लॅकमेल करण्यात माहीर आहेत. ते अधिकारी, राजकारणी, सर्वांना धमकावत आहेत. धमकाविण्यापलीकडे त्याच्याकडे दुसरे काय आहे?
- डी. के. शिवकुमार,
उपमुख्यमंत्री, कर्नाटक