आयटी सुविधांसाठी विमानतळे आठ अब्ज डॉलर खर्च करणार

By admin | Published: October 29, 2015 09:23 PM2015-10-29T21:23:45+5:302015-10-29T21:23:45+5:30

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जगभरातील विमानतळ ८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम आयटी विभागावर खर्च करण्याची शक्यता आहे.

It will spend eight billion dollars for IT facilities | आयटी सुविधांसाठी विमानतळे आठ अब्ज डॉलर खर्च करणार

आयटी सुविधांसाठी विमानतळे आठ अब्ज डॉलर खर्च करणार

Next

नवी दिल्ली : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जगभरातील विमानतळ ८ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम आयटी विभागावर खर्च करण्याची शक्यता आहे.
एअरपोर्टस कौन्सिल इंटरनॅशनल आणि ‘सीटा’ यांनी प्रायोजित केलेल्या वार्षिक विमानतळ सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे. पुढील तीन वर्षांत आॅपरेटर ‘स्मार्ट विमानतळ’ विकसित करण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत. सर्वेक्षणात म्हटले आहे की, जगभरातील विमानतळांवर आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीचा वेग वाढत आहे. २०१५ मध्ये या क्षेत्रातील गुंतवणूक ८.७ अब्ज डॉलरचा स्तर गाठू शकेल. विमानतळाचे मुख्य माहिती अधिकारी २०१६ सालासाठी अधिक आर्थिक तरतुदीची अपेक्षा करीत आहेत.

Web Title: It will spend eight billion dollars for IT facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.