हे चालणार नाही, ५ लाख दंड भरा : सरन्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:33 AM2024-02-17T07:33:34+5:302024-02-17T07:34:42+5:30
याचिकाकर्ता वकिलावर सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले की, जनहित याचिकांचा गैरवापर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड शुक्रवारी पुन्हा एका वकिलावर संतापले. सुनावणीदरम्यान त्यांनी वकिलाने दाखल केलेली जनहित याचिका फेटाळलीच, शिवाय ५ लाखांचा दंडही ठोठावला. एवढेच नाही, तर सरन्यायाधीश कोर्टरूममध्येच म्हणाले की, तुम्ही हे सर्व खासगी पक्षाच्या सांगण्यावरून करीत आहात.
याचिकाकर्ता वकिलावर सरन्यायाधीश संतापले आणि म्हणाले की, जनहित याचिकांचा गैरवापर केला आहे. पीआयएलचा गैरवापर केला जात आहे. तुम्ही निर्यात प्रोत्साहन क्षेत्रातील प्रक्रिया आदी नियमावलीला आव्हान देत आहात आणि हे सर्व काही खासगी पक्षाच्या इशाऱ्यावर केले जात आहे. आता हे सर्व चालणार नाही. तुम्हाला ५ लाख रुपयांची नोटीस पाठवत आहोत. खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, बचाव पक्षाच्या वकिलांनी यावर युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले की तुम्ही युक्तिवाद करण्यास मोकळे आहात, पण आम्ही तुम्हाला ५ लाख रुपयांची नोटीस देऊ. कारण तुम्ही हे सर्व एका खासगी कंपनीच्या सांगण्यावरून केले आहे. यानंतर वकिलाने सरन्यायधीशांकडे याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली, त्यानंतर खंडपीठाने याचिका फेटाळली. यापूर्वी मोठ्या आवाजात बोलणाऱ्या वकिलावर सरन्यायाधीश भडकले होते.