Coronavirus : कोरोनातून सावरलेल्या इटलीतील वृद्धाचा जयपूरमध्ये मृत्यू; निधनाचं कारण कोरोना नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 12:28 IST2020-03-20T12:07:59+5:302020-03-20T12:28:09+5:30
Coronavirus : कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Coronavirus : कोरोनातून सावरलेल्या इटलीतील वृद्धाचा जयपूरमध्ये मृत्यू; निधनाचं कारण कोरोना नाही!
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. शुक्रवारी (20 मार्च) जयपूरमध्ये कोरोनातून सावरलेल्या इटलीतील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या व्यक्तीच्या निधनाचं कारण कोरोना नसून कार्डिएक अरेस्टने त्याचा मृत्यू झाला आहे. ऐन्द्री कार्ली असं या 69 वर्षीय व्यक्तीचं नाव असून फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे भारतात आतापर्यंत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या शुक्रवारी (20 मार्च) 2,45,670 वर पोहोचली होती. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 10,049 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 88, 441 लोक बरेही झाले आहेत.
69-year-old Italian tourist, who had recovered from COVID-19, dies of cardiac arrest in Jaipur private hospital: SMS Hospital official
— Press Trust of India (@PTI_News) March 20, 2020
भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही रोज वाढत आहे. 163 भारतीयांना आणि 32 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली आहे. देशातील 20 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील 20 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक आणि पंजाबमध्ये एक अशा एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, छत्तीसगड, पद्दूच्चेरीमध्ये 1, दिल्लीमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, केरळमध्ये 28, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 2, तेलंगणामध्ये 16, गुजरात 2, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 19, लडाख 10, तमिळनाडू 3, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यताhttps://t.co/aToWC9ljXN#CoronaInMaharashtra#Coronaindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 20, 2020
महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पाच जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याची दिलासादायक माहितीही त्यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी शुक्रवारी (20 मार्च) पत्रकार परिषदेत राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीची माहिती दिली. 'राज्यातील जे कोरोनाग्रस्त आहेत त्यापैकी 5 जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना आणखी काही दिवस होम क्वारेंटाइन राहावं लागणार आहे. त्यामुळे मी राज्यातील जनतेला सांगू इच्छितो की, नागरिकांना घाबरून जाऊ नये. कोरोना झाल्यानंतरही रुग्ण बरे होतात. राज्यातील 1035 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 971 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. काल आणखी पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे' असं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वरhttps://t.co/20d6fl8uhe#Coronaindia#CoronaInMaharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) March 20, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
Coronavirus : देशातील 20 राज्यांत कोरोनाग्रस्त, रुग्णांची संख्या 195 वर
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये भारतीयाला चिनी समजून मारहाण
Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार
Nirbhaya Case : 'निर्भया'चे दोषी फासावर लटकल्यानंतर अरविंद केजरीवालांचा मोठा संकल्प