ऐकावे ते नवलच! टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क बाउन्सर्स; स्मार्टफोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:29 AM2023-07-10T09:29:18+5:302023-07-10T09:30:11+5:30
टोमॅटो १६० रुपये किलोने विकले जात आहेत. लोक केवळ ५० किंवा १०० ग्रॅम विकत घेत आहेत.
वाराणसी : देशभरात टोमॅटोच्या किमती १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्यामुळे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या स्टॉलचे संरक्षण करण्यासाठी बाउन्सर ठेवले आहेत.
अजय फौजी नावाच्या भाजी विक्रेत्याने सांगितले की, लोक टोमॅटो घेताना वाद घालत आहेत तसेच टोमॅटो देखील चोरी करत आहेत. आम्हाला आमच्या दुकानात कोणताही वाद नको म्हणून आम्ही दोन बाउन्सर नियुक्त केले आहेत. फौजी पुढे म्हणाले की, टोमॅटोच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांनी टोमॅटोचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटो १६० रुपये किलोने विकले जात आहेत. लोक केवळ ५० किंवा १०० ग्रॅम विकत घेत आहेत.
फोनसोबत टोमॅटो फ्री
मध्य प्रदेशातील स्मार्टफोन दुकान मालकाने ग्राहकांना मोबाइल फोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानाचे मालक अभिषेक म्हणाले की, आम्हाला ग्राहकांना ऑफर द्यायची होती. आम्ही स्मार्टफोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला.