ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 03:02 PM2019-05-12T15:02:17+5:302019-05-12T15:02:53+5:30

ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. 

It's been a really inspiring experience, Australia's Envoy to India, Harinder Sidhu | ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया 

ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी केली भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रसंसा, EVMबाबत दिली अशी प्रतिक्रिया 

googlenewsNext

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत. मात्र  येथील निवडणूक आयोगाचे काम आणि इव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित  झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि इव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. 

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राजदूत म्हणाल्या की, ''भारतातील निवडणूक प्रक्रिया ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सुव्यवस्थित निवडणूक आयोग आणि त्याचे प्रशिक्षित अधिकारी असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या मतदानाची व्यवस्था होऊ शकत नाही. ही एक चांगली आणि सुव्यवस्थित प्रणाली आहे.'' 





यावेळी हरिंदर सिद्धू यांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचेसुद्धा कौतुक केले. "'इव्हीएम मशीनमुळे  मी खूप प्रभावित झाले आहे. ऑस्ट्रेलियात अशी व्यवस्था नाही. मला वाटते बॅलेट पेपर म्हणजेच जी प्रणाली ऑस्ट्रेलियात वापरली जाते. तिच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात. तसेच आता इव्हीएमला नव्याने जोडण्यात आलेली व्हीव्हीपॅट मशीनची प्रणालीसुद्धा खूप चांगली आहे.'' असे त्यांनी सांगितले. 



 

Web Title: It's been a really inspiring experience, Australia's Envoy to India, Harinder Sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.