अॅल्युमिनियमचे कोच वाढवणार रेल्वेचा वेग; रायबरेलीत होणार उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 14:00 IST2018-08-27T13:57:28+5:302018-08-27T14:00:07+5:30
पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते.

अॅल्युमिनियमचे कोच वाढवणार रेल्वेचा वेग; रायबरेलीत होणार उत्पादन
नवी दिल्ली- भारतामध्ये प्रथमच रायबरेलीतील मॉडर्न कोच फॅक्टरी येथे वजनाने अत्यंत हलके आणि टिकाऊ असे रेल्वे कोच बनवले जाणार आहेत. हे कोच अॅल्युमिनियमपासून तयार केले जाणार आहेत. पुढील आर्थिक वर्षामध्ये हे डबे भारतामध्ये वापरले जाण्याची शक्यता आहे.
पोलादी डब्यांच्या तुलनेत हे कोच वजनाने हलके असून कमी ऊर्जेच्या मदतीने खेचले जाऊ शकताच यामुळे रेल्वेची गतीही वाढवली जाऊ शकते. रेल्वेच्या आधुनिकीकरण मोहिमेत या नव्या डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. दिल्ली मेट्रोसाठीही अॅल्युमिनियम कोचेसचा वापर केला गेला आहे.
Modern Coach Factory, RaeBareli Produces Record 368 LHB Coaches in First 4 months of FY 2018-19
— Rail Analysis India (@RailAnalysis) August 4, 2018
Read Here...https://t.co/wUUyxpLSR7#IndianRailways#ModernCoachFactory#RailAnalysis#Railpic.twitter.com/GED3yCjmDV
मॉडर्न कोच फॅक्टरीने या अॅल्युमिनियम कोचचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दिला असून त्यांच्या मंजुरीनंतर उत्पादन सुरु होईल. यासाठी जपान किंवा युरोपातून तंत्रज्ञान आणले जाईल. त्यासाठी भारतीय तज्ज्ञांचे शिष्टमंडळ या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये युरोपमध्ये भेट देऊन आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून युरोपमधील काही देश आणि जपान या डब्यांचा वापर करत आहेत.
मॉडर्न कोच फॅक्टरीने वर्षाला 250 कोच बनवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे तर रेल्वे बोर्डाने वर्षाला 500 कोच बनवण्यासाठी प्रकल्प अहवाल बनवण्याचे सुचवले आहे. सध्या भारताकडे त्याचे तंत्रज्ञान नसल्यामुळे सुरुवातील या कोचची किंमत अधिक असेल.