नवीन डिझाईनचे पॅन कार्ड, छेडाछाड करणं मुश्किलच नाही नामुमकीन
By admin | Published: January 14, 2017 10:19 AM2017-01-14T10:19:48+5:302017-01-14T10:19:48+5:30
केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेले पॅन कार्ड जारी केले आहे. नव्या डिझाईनच्या या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - केंद्र सरकारने नवीन डिझाईन असलेले पॅन कार्ड जारी केले आहे. नव्या डिझाईनच्या या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अतिरिक्त वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पॅन कार्डमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करणं आता अशक्य आहे.
दरन्यान, नवीन पॅन कार्डमध्ये संबंधित व्यक्तीची माहिती हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये कार्डवर छापलेली असणार आहे. आधीच्या कार्डवर केवळ इंग्रजी भाषा वापरण्यात आली आहे. शुक्रवारी आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिका-याने पॅन कार्डच्या या नवीन डिझाईनबाबतची माहिती दिली.
एन.एस.डी.एल., यूटीआय इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नोलॉजी आणि सर्विसेस लिमिटेडने या नवीन कार्डचे छपाईकाम केले आहे. सरकारने या कार्डमध्ये क्विक रिस्पॉन्स (क्यू.आर. म्हणजे जलद प्रतिसाद) हा नवीन कोड जोडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पॅन कार्डमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे.
1 जानेवारीपासून नवीन कार्डचे वाटप सुरू करण्यात आल्याची माहितीही अधिका-याने दिली आहे, मात्र केवळ नवीन अर्जदारांसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.