चंद्रावर झाली सकाळ, आता ISRO चंद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरला जागवणार? मिळतेय अशी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 09:07 AM2023-09-21T09:07:35+5:302023-09-21T09:07:58+5:30
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-३ चा लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्याची तयारी सुरू आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-३ चा लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्याची तयारी सुरू आहे. मात्र हे लँडर आणि रोव्हर पुन्हा एकदा कार्यरत होतील याची शक्यता कमी आहे. हे लँडर आणि रोव्हर स्लिप मोडवर गेलेले असून, ते स्लिप मोडमधून जागून पुन्हा कार्यरत झाले तर ती आनंददायक बाब असेल. चंद्रावर बुधवारचा दिवस खूपच थंड होता. त्यामुळे आज सूर्यप्रकाश वाढल्यानंतर लँडर आणि रोव्हरला जागवलं जाईल.
याबाबत इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राऊंड स्टेशन कमाल सूर्यप्रकाश उपलब्ध झाल्यानंतर गुरुवार किंवा शुक्रवारी लँडर, रोव्हर मॉड्युल आणि ऑनबोर्ड उपकरणांना पुनरुर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता कमी आहे. मात्र ही निराशाजनक बाब नसेल. कदाचित मॉड्युल आणि रोव्हर स्लिप मोडमधून जागे होती, पण पूर्ण क्षमतेने काम करण्याची शक्यता कमी आहे.
सौर उर्जेवर चालणारे चंद्रयान-३ मॉड्युल मोहिमेचा कार्यकाळ हा एक चांद्र दिवस अर्थात पृथ्वीवरील १४ दिवसांएवढा होता. लँडर आणि रोव्हरमध्ये लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना चंद्रावरील अतिथंड तापमानाचा सामना करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले नव्हते. चंद्रयान ३ चं जिथे लँडिंग झालं आहे तिथे तापमान -२०० डिग्री सेल्सियसच्या खूप खाली जाते. दोन्ही स्लिप मोडमधून सक्रिय झाले तर ते पुढील १४ दिवस कार्यरत राहू शकतात.