जे. मंजुळा बनल्या डीआरडीओच्या पहिल्या महिला महासंचालक
By admin | Published: September 11, 2015 04:02 AM2015-09-11T04:02:33+5:302015-09-11T09:17:26+5:30
जे. मंजुळा यांची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी (इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम) नियुक्ती करण्यात आली आहे.
बेंगळुरू : जे. मंजुळा यांची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी (इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना डीआरडीओ समूहाच्या पहिल्या महिला महासंचालक बनण्याचा मान मिळाला आहे.
जे. मंजुळा यांनी बुधवारी डीआरडीओचे महासंचालक (इलेक्ट्रॉनिक अॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम) म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले प्रख्यात शास्त्रज्ञ आणि महासंचालक डॉ. डी. के. नायक यांच्याकडून सूत्रे हाती घेतली. जे. मंजुळा यांना तत्पूर्वी त्या जुलै २०१४ पासून डीआरडीओच्या संरक्षण वैमानिकी संशोधन प्रतिष्ठानमध्ये संचालकपदावर कार्यरत होत्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स अभियंता असलेल्या मंजुळा या उस्मानिया विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. (वृत्तसंस्था)