जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 12:48 PM2018-08-22T12:48:33+5:302018-08-22T12:57:30+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शाबीर अहमद भट असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पुलवामामधील शाबीर अहमद भट यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. शाबिर अहमद हे भाजपामध्ये सक्रीय होते. भाजपाच्या युवा मोर्चाचे ते पदाधिकारीही होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात जम्मू- काश्मीरमध्ये महापालिका आणि पंचायत निवडणूक घेण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर दहशतवाद्यांनी ही हत्या केली आहे.
Jammu and Kashmir: Shabir Ahmad Bhat, who is affiliated with the Bharatiya Janata Party (BJP), was shot dead by terrorists at around 2:30 am today at his home in Pulwama's Rakh-e-litter. pic.twitter.com/30ALqDerat
— ANI (@ANI) August 22, 2018
शाबीर अहमद भट यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
Srinagar: Members of #JammuAndKashmir BJP pay tribute to BJP worker Shabir Ahmad Bhat, who was shot dead by terrorists this morning at his home in Pulwama's Rakh-e-litter. pic.twitter.com/7LjxVGpdjn
— ANI (@ANI) August 22, 2018
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फडकले पाकिस्तान व इसिसचे झेंडे
काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर काही युवकांनी पाकिस्तान आणि अतिरेकी संघटना असलेल्या इसिस (इस्लामिक स्टेट इन इराक अॅण्ड सीरिया) चे फडकवले. यावेळी झेंडे फडकवणारे युवक आणि पोलिसांत जोरदार संघर्ष उडाला. युवकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
The celebrations of Eid-Al-Adha was marred by violence in Jammu and Kashmir's Srinagar city when stone-pelters came out on the streets and waved flags of Pakistan and dreaded terrorist group Islamic State of Iraq and Syria (ISIS)
— ANI Digital (@ani_digital) August 22, 2018
Read @ANI Story | https://t.co/CwxNlXAOanpic.twitter.com/QChskuPCVN