जबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 22 जखमी

By admin | Published: March 30, 2017 05:54 AM2017-03-30T05:54:16+5:302017-03-30T09:39:37+5:30

उत्तर प्रदेशमधील माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत

Jabalpur-Delhi Maha Kaushal Express collapsed, and 22 injured | जबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 22 जखमी

जबलपूर-दिल्ली महाकौशल एक्सप्रेस रुळावरून घसरली, 22 जखमी

Next

ऑनलाइन लोकमत 

लखनौ, दि. 30 -  उत्तर प्रदेशमध्ये माहोबाजवळ महाकौशल एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. जबलपूरहून निजामुद्दीनकडे निघालेल्या महाकौशल एक्सप्रेसला गुरुवारी पहाटे 2.30 च्या सुमारास माहोबा-कुलपहाड स्टेशनांदरम्यान हा अपघात घडला.

जबलपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी महाकौशल एक्स्प्रेस माहोबाजवळीस चरखारी रेल्वेस्टेशनाजवळ एक्स्प्रेसचे मागील आठ डबे रुळावरून घसरले. अपघातग्रस्त झालेल्या डब्यांमध्ये तीन एसी आणि तीन सामान्य वर्गातील डब्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र जीवितहानीचे वृत्त आलेले नाही. रात्रीच्या दाट अंधारात मदत आणि बचाव कार्यं सुरू आहे. 
( आंध्र प्रदेशात रेल्वे अपघातात ३९ ठार )

 

याबाबत अधिक माहिती देताना एसपी गौरव सिंग यांनी या अपघातात कुणाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या 10 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 
( कानपूर रेल्वे अपघातामागे पाकिस्तानचा हात? )
 
गेल्या काही काळापासून सातत्याने रेल्वे अपघात होत असून, 22 जानेवारीला आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यातील कोनेरू स्टेशनजवळ जगदलपुर- भुवनेश्वर हीराखंड एक्सप्रेस (18448) अपघातग्रस्त होऊन 32 जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधील कानपुरजवळ पुखराया येथे झालेल्या रेल्वे अपघातात 150 हून अधिक प्रवाशांना प्राणास मुकावे लागले होते. 

 

Web Title: Jabalpur-Delhi Maha Kaushal Express collapsed, and 22 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.