रेल्वे कर्मचाऱ्यांना जॅकेट, टी शर्ट

By admin | Published: July 3, 2017 12:53 AM2017-07-03T00:53:01+5:302017-07-03T00:53:01+5:30

आॅक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या सणासुदीच्या हंगामापासून रेल्वेच्या पाच लाख कर्मचाऱ्यांना ख्यातनाम डिझायनर रितु बेरी यांनी डिझाइन केलेले

Jackets for railway employees, T-shirt | रेल्वे कर्मचाऱ्यांना जॅकेट, टी शर्ट

रेल्वे कर्मचाऱ्यांना जॅकेट, टी शर्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आॅक्टोबरमध्ये सुरु होणाऱ्या सणासुदीच्या हंगामापासून रेल्वेच्या पाच लाख कर्मचाऱ्यांना ख्यातनाम डिझायनर रितु बेरी यांनी डिझाइन केलेले रुबाबदार व आकर्षक गणवेश मिळणार आहेत. पूर्ण किंवा अर्ध्या बाह्यांचे चमकत्या रंगाचे जॅकेट व काळ््या आणि पिवळ््या रंगाचे टी शर्ट यांचा या गणवेशात समावेश आहे.
प्रवाशांशी संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे गणवेश देण्यात येणार आहेत. यात रेल्वेचे ड्रायव्हर व गार्ड, तिकीट तपासनीस, स्टेशन मास्तर आणि केटरिंंग कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थ संकल्पात याचा उल्लेख केला होता. केटरिंग कर्मचाऱ्यांसाठी काळ्या आणि पांढऱ्या बॉर्डरसह अन्य टी शर्ट डिझाइन करण्यात आले. तिकीट तपासणीस, गार्ड आणि ड्रायव्हरसाठी पिवळ्या आणि हिरव्या रंगांचे चमकदार जॅकेट असतील. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पादन विभाग आणि तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवा गणवेश दिला जाईल.  

राजधानी, शताब्दीपासून श्रीगणेशा करणार
राजधानी आणि शताब्दी यासारख्या रेल्वेत प्रथम या गणवेशाचे कर्मचारी दिसतील. त्यानंतर अन्य रेल्वेमधील कर्मचाऱ्यांनाही हा गणवेश दिला जाईल.

Web Title: Jackets for railway employees, T-shirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.