जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल भाजपात
By admin | Published: January 10, 2017 01:02 PM2017-01-10T13:02:05+5:302017-01-10T16:07:00+5:30
अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भारतीय जनता पार्टी(भाजपा)मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भारतीय जनता पार्टी(भाजपा)मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत दोघेही भाजपाचा प्रचार करताना दिसू शकतात. आज अर्जुनने दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. यावेळी अर्जुनने राजकीय प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला नसला तरी त्यास थेट नकारही दिला नाही. मी काही नेता नाही. राजकारण करण्यासाठी मी येथे आलेलो नाही. तर भाजपाला कसा पाठींबा देता येईल, हे ठरवण्यासाठी मी येथे आलोय. भाजपाने उभा केलेला उमेदवार योग्य आहे, असे मला वाटलेच तर मी त्याचा प्रचार करू शकतो,असे तो म्हणाला.
अर्जुनसह ५९ वर्षांचा अभिनेता जॅकी श्रॉफही भाजपात प्रवेश करू शकतो. त्यानेही अलीकडे भाजपा नेत्यांची भेट घेतली. हे दोघेही उत्तर प्रदेश व पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करू शकतात
उत्तरप्रदेशची निवडणूक प्रचाराचे बिगूल वाजले आहे. एकूण सात टप्प्यात निवडूक पार पडणार आहे. जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल यांनी प्रचार केल्यास भाजपालाच याचा फायदा होण्याची शक्यता आहे.