जाधव यांना फाशी म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट,भारतानं ठणकावलं
By Admin | Published: April 10, 2017 07:08 PM2017-04-10T19:08:10+5:302017-04-10T19:18:28+5:30
भारताचे माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे हत्येचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप भारताकडून
कोण आहेत कुलभूषण जाधव?
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. जाधव यांचा इराणी बंदरावरून माल पाकिस्तानात आणण्याचा व्यवसाय आहे. त्यांना पाकिस्तानने बलुचिस्तान येथून अटक केली आहे. मुंबईतील कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये एका महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणला गेला होता. त्यांचा आणि भारताच्या रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या गुप्तचर यंत्रणेशी काडीमात्र संबंध नाही. त्यांनी नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांचे वडील हे माजी पोलीस सहायक आयुक्त आहेत. कुलभूषण यांनी तीन महिन्यांपूर्वी आपले वडील सुधीर जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, तर पत्नीशी तो एका महिन्यापूर्वी बोलला होता. त्यानंतर ना त्याचा फोन वा मेल आला, ना त्याच्याशी घरच्यांचा संपर्क झाला. त्यामुळे एका महिन्याच्या काळातच त्याला पाकिस्तान सरकारने अटक केली असावी, असे घरच्यांना वाटत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्गो व्यवसायात असलेला कुलभूषण इराणमधील बंदर अब्बास आणि छाबहर बंदरांतून मालवाहतूक करीत असे. त्याच्याकडे इराणमध्ये जूनपर्यंत राहण्यासाठी अधिकृत परवाना होता. त्याचा स्वत:च्या व्यापाराखेरीज कशाशीही संबंध नव्हता, असे त्याच्या निकटवर्तीयांनीही सांगितले.