जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य संशोधन केंद्रांची निर्मिती व्हावी
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:38+5:302015-08-26T23:32:38+5:30
अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेची मागणी
Next
अ िल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेची मागणी नाशिक : कुंभमेळा तब्बल बारा वर्षानंतर भरतो, त्यामुळे तो एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी जगद्गुरू स्वामी रामानंदाचार्य यांच्या नावाने तपोवनात संशोधन केंद्रांची निर्मिती व्हावी अशी मागणी अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.के. वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत केली.तसेच कुंभमेळा वैष्णव समाजाचा असूनही कुंभमेळ्याच्या शासकीय समित्यांवर अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषदेच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. वैष्णव समाज गृहस्थी, विरक्ती असा विभागला गेलेला आहे. ज्यांना या समित्यांवर स्थान दिले आहे, त्यांना बैरागी वैष्णव समाजाबाबत कोणतीही माहिती नाही. विधानमंडळातही आरक्षण मिळवून आमच्या बैरागी वैष्णव समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, महाराष्ट्रात तीन लाख इतका बैरागी समाज आहे. बैरागी वैष्णव समाजाची स्वतंत्र आकडेवारी शासनाकडून घोषित व्हावी, बैरागी समाज ही स्वतंत्र जात असून, शासनाच्या राजपत्रात गोसावी तत्सम बैरागी असा सोयीने उल्लेख करण्यात आला आहे. सरकारच्या सूचीमध्ये बैरागी वैष्णव समाजाच्या अभ्यासकांची मते घेऊन दुरुस्ती करण्यात यावी, मंदिराच्या इनामी जमिनी परंपरागत पुजारी वैष्णव बैरागी यांना मिळाव्यात, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आरक्षण मिळावे आदि मागण्या पत्रकार परिषदेत करण्यात आल्या. यावेळी परिषदेचे अध्यक्ष अशोकदास बैरागी, दीपक बैरागी, बाळासाहेब बैरागी, कल्पेश वैष्णव आदि उपस्थित होते. ( प्रतिनिधी)इन्फो: मंदिरांच्या शेजारी वैष्णव समाजाच्या बैरागींना राहण्यासाठी परंपरांगत जमिनी आहेत; मात्र या जागा जिल्हाभरात बहुतांश व्यापार्यांनी बळकावल्या आहेत. सदर व्यापार्यांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळाव्यात. दीपक वैष्णव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अखिल भारतीय वैष्णव बैरागी परिषद