कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 05:06 PM2021-05-05T17:06:50+5:302021-05-05T17:13:40+5:30

Jagan Mohan Reddy's Government : सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत.

jagan mohan reddy government gives 5k to plasma donors and 15k to covid deceased for last rites | कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णय

कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दान करा अन् ५ हजार रुपये मिळवा!, जगन सरकारचा मोठा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देबंदी घातलेल्या चिनी अ‍ॅप्सचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कामकाज केवळ बेकायदेशीरच नाही तर माहिती तंत्रज्ञान कायदा व इतर कायद्यांतर्गत गुन्हाही आहे.

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने (Jagan Mohan Reddy's Government) प्लाझ्मा दान करणाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेशात जवळपास ३७००० लोक प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. अशात कोरोना रूग्णांवर योग्य उपचार होऊ शकतील, यासाठी राज्य सरकारने प्लाझ्मा दान करण्यासाठी शिबिर सुरू केले आहे. (jagan mohan reddy government gives 5k to plasma donors and 15k to covid deceased for last rites)

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या निर्देशानुसार, या प्लाझ्मा दानसंदर्भातील कार्यक्रमाला चालना देण्यासाठी प्रत्येक प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीला पाच रुपये देऊन मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, कोरोनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या अंतिम विधीसाठी राज्य सरकारने १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

ब्लड बँकांच्या संपर्कात
विशेष प्लाझ्मा दान कार्यक्रम मोहिमेविषयी अधिक माहिती देताना राज्य आरोग्य आयुक्त कटमनेनी भास्कर म्हणाले की, "पात्र प्लाझ्मा दान करणाऱ्यांचा डेटाबेस तयार केला जात आहे आणि सध्या प्लाझ्मा असलेल्या ब्लॅड बँकांना संपर्क करण्यात येत आहे."

(CoronaVirus Live Updates : "ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही"; हायकोर्टाकडून कानउघाडणी)

दररोज १५ कोटी खर्च करतेय सरकार
भास्कर यांनी सांगितले की, आरोग्य विभाग कॉल सेंटर कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना कॉल करेल आणि त्यांना प्लाझ्मा देणगी कार्यक्रमाबद्दल सांगेल. तसेच,  त्यांना प्लाझ्मा दान करण्यास आणि इतरांचे प्राण वाचविण्यास राजी करेल." दरम्यान, सध्या अन्न, गृहनिर्माण, औषधे आणि चाचण्यांसह एकूण कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार दररोज सुमारे १५ कोटी रुपये खर्च करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना नियमितपणे राज्यातील कोरोना स्थितीविषयी अपडेट केले जात आहे.

आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू 
दरम्यान, आंध्र प्रदेशात मंगळवारी कोरोना संसर्गाचे २०,०३४ नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील संक्रमित लोकांची संख्या ११,८४, ०२८ वर गेली आहे. हेल्थ बुलेटिनच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण १०,१६,१४२ लोक बरे झाले आहेत. तसेच, कोरोनामुळे आतापर्यंत ८, २८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १,५९,५९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 

Web Title: jagan mohan reddy government gives 5k to plasma donors and 15k to covid deceased for last rites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.